पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडेवर बुमराहचा लेक, फोटो होतोय व्हायरल

Jasprit Bumrah Son | टीम इंडिया द. आफ्रिकेविरूद्ध टी 20 विश्वचषकात विजय मिळवून बारबाडोस वरून दिल्लीत आली होती. त्यानंतर संघ आता मुंबईत दाखल झाला. दिल्लीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टीम इंडिया संघ टी 20 विश्वचषकाची ट्रॉफी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीसोबत फोटो सोशन देखील केलं होतं. हे सर्व झाल्यानंतर मोदींनी टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचा लेक (Jasprit Bumrah Son) अंगदला कडेवर घेतलं होतं. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बुमराहचा लेक पंतप्रधानांच्या कडेवर

यावेळी मोदींनी टीम इंडियासोबत विविध विषयांवर चर्चा केली. ही चर्चा तब्बल दीड तास सुरू होती. यावेळी मोदींनी खेळाडूंच्या खेळातील किस्से देखील एकूण घेतले. त्यांनी सर्व खेळाडूंसोबत मनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संघाने नाश्ता केला. याचवेळी फोटो सेशन करत असताना मोदींनी बुमराह त्याची पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगदसोबत फोटशूट केलं. यावेळी पंतप्रधानांनी अंगदला आपल्या कडेवर घेतलं. बुमराहने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Jasprit Bumrah Son)

टी 20 विश्वचषक विजयी झाल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासह आनंद घेतला. यावेळी सर्वच खेळाडू चर्चेत आले. मात्र यामध्ये टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपली पत्नी आणि मुलासह विजयाचा आनंद साजरा केला. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

बुमराहने आपल्या गळ्यातील मेडल काढत आपल्या मुलाच्या गळ्यात अडकवले. तो क्षण कॅमेऱामनने व्हिडीओ काढत टिपला. त्यानंतर आता टीम इंडिया टी20 ट्रॉफी घेऊन मुंंबईकडे येत असताना इंडियाने मोदींची भेट घेतली होती. तेव्हा बुमराह फॅमिली मोदींसोबत फोटो सेशन करत असताना मोदींनी जसप्रीत बुमराहचा लेक अंगदला कडेवर घेतलं. त्याचे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. (Jasprit Bumrah Son)

भारतीय संघाने फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला आणि टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावर केली.अंतिम सामन्यात बुमराहने वेळेप्रसंगी महत्त्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. बुमराहचा वापर कुठे आणि कसा करायचा याचा अभ्यास टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला आहे. त्याने बुमराहचा योग्य  परिस्थिती साधून वापर करत द. आफ्रिकेवर दबाव आणण्याचं काम केलं. (Jasprit Bumrah Son)

अंतिम सामन्यात बुमराहने पटकवला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ किताब

अंतिम सामन्यात बुमराहने चांगली कामगिरी केली. संपूर्ण विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात प्रत्येक खेळाडूने आपल्याकडून शंभर टक्के विजयाची गॅरंटी दिली होती. तसेच अंतिम सामन्यात बुमराहच्या कामगिरीने ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ किताब पटकवला आहे.

News Title – Jasprit Bumrah Son Angad Wife Sanjana Ganeshan Meet With Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवुडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; राज कपूर-देवानंद यांच्यासोबत केलंय काम

एसबीआय बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; लगेचच करा अर्ज

“गौतम अदानींना जमीन देण्यास विरोध केल्यानेच…”; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; वेळ वाया घालू नका, ‘इथे’ करा अर्ज

“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”