मुंबईच्या पराभवानंतर बुमराहची फॅन मोमेंट, धोनीला पाहून म्हणाला…

On: April 16, 2024 10:06 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

Jasprit Bumrah | सध्या देशामध्ये आयपीएलचा हंगाम आहे. दररोज आयपीएलमध्ये नवनवीन ट्वीस्ट घडताना दिसत आहे. मुंबई आणि सीएसकेच्या सामन्यामध्ये सीएसकेनं चांगली कामगिरी करत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या चौथ्या पराभवानंतर मुंबईचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह महेंद्रसिंह धोनीच्या ड्रेसिंगरूममध्ये गेला. त्यावेळी बुमराहची (Jasprit Bumrah) फॅन मोमेंट पाहायला मिळाली.

मुंबई इंडियन्स विरूद्ध सीएसके सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झाला. पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ड्रेसिंगरूममध्ये दिसला. एका फॅनप्रमाणे त्यानं महेंद्र सिंह धोनीसोबत वर्तवणूक केलं. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीसोबत फोटो काढण्याचा बुमराहला (Jasprit Bumrah) मोह आवरला नाही. त्याने धोनीसोबत फोटो काढत फॅन मोमेंट एन्जॉय केला. बुमराहने (Jasprit Bumrah) सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे.

बुमराहला धोनीसोबत फोटो काढायचा होता. त्यामुळे बुमराह धोनीसोबत उभा राहिला, सीएसकेच्या एका खेळाडून बुमराह आणि धोनीचा एकत्र फोटो काढला. बुमराहने त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. सध्या ती पोस्ट चर्चेत आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये “माहीभाई बऱ्याच दिवसानंतर भेटलो, भेटून चांगलं वाटलं”, अशी पोस्ट करत बुमराहने धोनीसोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)


महेंद्र सिंह धोनीच्या फलंदाजी वेळी बुमराहला गोलंदाजी करता आली नाही. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. धोनीने 4 चेंडूंमध्ये 20 धावा काढल्या. त्यात तीन षटकार हे धोनीचे होते. त्यानंतर 20 धावांनी मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

2016 साली जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. सीएसके विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.

News Title – Jasprit Bumrah Fan Moment With MS Dhoni

महत्त्वाच्या बातम्या

सूनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मतदान कार्ड हरवलयं तर नो टेन्शन! इतर कागदपत्रांच्या मदतीने करता येणार मतदान

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावर दगडफेक!

महाअष्‍टमीच्या शुभ योगात ‘या’ 5 राशींना धनलाभ होणार!

राम नवमीनिमित्त ‘या’ शहरात बँकांना सुट्टी; आजच सर्व कामे उरकून घ्या

 

Join WhatsApp Group

Join Now