मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली…

On: November 12, 2023 4:26 PM
---Advertisement---

ठाणे | महाराष्ट्रात डान्सिंग क्विन म्हणून सध्या गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे. गौतमी कायम कोणत्या न कोँणत्या कारणावरुन चर्चेत असते. दही हांडीमध्ये गौतमीने अनेक ठिकाणी आपल्या नृत्याच्या कला दाखवत चहात्यांच्या मनात घर केलं. दरम्यान गौतमीने आज ठाणे चांगलच गाजवलं.

ठाणे येथे तलाव पाळी येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सबसे कातील, गौतमी पाटील हिच्या खास शोचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलने ठाण्यात लावणी सादर करत तरुणाईला नेहमीप्रमाणे घायाळ करुन सोडलं.

ठाण्यातील चिंतामणी चौकात तरुणाई गौतमीच्या कार्यक्रमात मनोसक्त जल्लोष करत होते. सकाळपासून तरुणाईने बेधुंदपणे डीजेच्या तालावर जल्लोष केला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, मी पहिल्यांदाच ठाण्यात आली. मला ठाणेकरांचं प्रेम एक नंबर वाटलं.

मी मुंबईत नेहमी येत असते मला मुंबईतील जनता मला खूप आवडते. मला नेहमीचं मुंबईतील मुंबईकरांचं प्रेम मिळत असतं. आज लक्ष्मीपूजन असून आज सकाळी पाच वाजेपासूनच लोकं येऊन थांबली होती.

त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम पाहून खरंच खूप भारी वाटतंय. तर यावेळी गौतमीने प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्यात. या सोबतच ठाण्याच्या तरुणांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या फिल्मीज म्युसिकल बँडची देखील मेजवानी ठाणेकरांसाठी ठेवण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!

सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर

अभिजीत बिचुकलेंचं शिंदेंना पत्र, केली मोठी मागणी 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now