लठ्ठपणा कमी करेल, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहील; गूळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे

Jaggery Benefits | साखरेपेक्षा गूळ खाणे कधीही चांगले, असं म्हटलं जातं. कारण, गूळ जितका स्वादिष्ट आहे, तितकाच तो आयुर्वेदिक औषध म्हणूनही काम करतो. गूळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

बरेच जण गुळाचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात वापर करत असतात. कुणी गुळ पोळी, कुणी झोपेच्या आधी दुधासोबत गुळ खातं, तर कुणी गुळाचा चहा सेवन करतं. मात्र, सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्याने त्याचे फायदे दुप्पट मिळतात. या लेखात सकाळी गुळ खाण्याचे काय फायदे मिळतात, याबाबत सविस्तर सांगितले आहे.

गुळ खाण्याचे फायदे

पोटासाठी खूप फायदेशीर : सकाळी रिकाम्या (Jaggery Benefits ) पोटी गूळ खाऊन पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनक्रिया मजबूत होते. बद्धकोष्ठता किंवा अॅसिडिटीची समस्या असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने मोठा आराम मिळेल.

लोहाची कमतरता दूर होते : गुळात लोह मोठ्या प्रमाणात आढळते. रोज सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊन पाणी प्यायल्याने शरीरातील रक्त स्वच्छ होते आणि लोहाची कमतरता दूर होते. गुळामध्ये कार्बोहायड्रेट देखील आढळतात, ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

रक्तदाब नियंत्रणात राहील : आजकाल उच्च रक्तदाब असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा व्यक्तींसाठी गुळ खूप फायद्याचा आहे. रक्तदाबाच्या रुग्णांनीही सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊन त्यावर पाणी प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ : सकाळी (Jaggery Benefits ) रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी 6 आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यासोबतच गूळ इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करतो.

वजन नियंत्रित राहते : गुळात असलेले पोटॅशियम शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी गूळ खाणे आणि पाणी पिणे देखील शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

News Title – Jaggery Benefits

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता अजित पवारही करणार पायीवारी!

मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

“माझा वापर केला, माझी इज्जत..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

धक्कादायक! पुणे शहरात उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला

‘लाडकी बहीण योजने’साठी आता मोबाइलवरून करा अर्ज; ‘या’ स्टेप्स करा फॉलो