Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ

On: January 5, 2024 10:45 AM
Jacqueline Fernandez
---Advertisement---

Jacqueline Fernandez | अटकेत असलेला ठग सुकेश चंद्रशेखर सातत्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसबद्दल नवे दावे करत आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि ठग सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सतत एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच सुकेशने अलीकडेच जॅकलिनसोबतचे त्याचे जुने व्हॉट्सॲप चॅट शेअर केले आहे. त्याने सांगितले की, या प्रकरणातील आरोपी जॅकलीन फर्नांडिस आहे.

Jacqueline Fernandez सोबतची चॅट उघड

कॉनमॅन सुकेशने जॅकलीनसोबतचे व्हॉट्सॲप चॅट शेअर केले. तसेच त्याने स्वत: लिहलेल्या कार्डचा देखील दाखला दिला आहे. कार्डवर लिहले, “मी कायमचा तुझा आहे…लव बोट्टा बोम्मा.” सुकेशने दावा करत म्हटले, “तुम्ही सध्या जी चॅट पाहत आहात ती 2021 मधील त्या दिवसांपैकी एक आहे जेव्हा माझ्या आणि जॅकीमध्ये गैरसमज झाला होता आणि त्यानंतरची ही चॅट आहे. चॅटमध्ये तुम्ही तिला माफी मागताना आणि माझ्यावरील प्रेम व्यक्त करताना पाहू शकता.”

दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या प्रेमपत्रात सांगितले की, हा फक्त टीझर असून, यामध्ये शकडो चॅट्स, व्हॉईस रेकॉर्डिंग आणि व्हिडीओ चॅट आहेत. जे तो तपास एजन्सीसमोर सादर करणार आहे.

Jacqueline Fernandez वर गंभीर आरोप

आता आपल्याकडे कोणताही पर्याय उरला नसल्याचे सुकेशने सांगितले. त्याने जॅकलीनवर गंभीर आरोप करताना म्हटले, “अभिनेत्रीने 200 कोटींच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित अनेक तथ्ये लपवली आहेत. त्यामुळे मी ईडीकडे पुरावा म्हणून चॅट आणि मी स्वत: लिहलेले कार्ड सोपवले आहे, ज्यातून सर्वकाही उघड होईल.”

Jacqueline Fernandez वादाच्या भोवऱ्यात

दुसरीकडे, सुकेश चंद्रशेखरने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असून, त्याचा आवाज आणि चॅट्स एआय वापरून तयार केला असल्याचा दावा त्याने केला. याशिवाय त्याने असेही सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इतर काही मेसेजसची तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर ते माझ्याकडून पाठवले गेले नसल्याचे सिद्ध झाले.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणांनी अनेकवेळा चौकशी केली आहे. तिने याचिका दाखल केली आहे की तिला या जाळ्यात फसवले जात आहे. तसेच तिच्यावरील खटला रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, हे प्रकरण अद्याप न्यायालयाच्या चौकटीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी

IND vs SA | ‘मी फ्लाइट पकडली अन् घरी…’, Sachin Tendulkarनं सांगितला भन्नाट किस्सा

Amir khan ने पहिल्या बायकोसमोर केलं दुसऱ्या बायकोला Kiss; व्हिडीओ तूफान व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now