अभिनेत्री जॅकलिनच्या इमारतीला रात्री भीषण आग; अंगावर काटा आणणारी दृश्ये

On: March 7, 2024 12:16 PM
Jacqueline Fernandez
---Advertisement---

Jacqueline Fernandez | बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मुंबईतील पॉश ठिकाण असलेल्या वांद्रे पश्चिम येथील पाली हिल भागात राहते. नवरोज हिल असे या सोसायटीचे नाव आहे. जिथे बुधवारी रात्री आगीची घटना घडली. (Jacqueline Fernandez Building) अभिनेत्री या सोसायटीच्या 15 व्या मजल्यावर राहते आणि 14 व्या मजल्यावर भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जॅकलिन फर्नांडिस वास्तव्यास असलेल्या इमारतीला भीषण आग लागली अन् परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

इमारतीला लागलेल्या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आग आणि धुराचे लोट पाहून अंगावर काटा येईल. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इमारतीत राहणारे सर्वजण सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

इमारतीला भीषण आग

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नर्गिस दत्त रोडवरील नवरोज हिल सोसायटीच्या 14व्या मजल्यावर रात्री 8 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. या घटनेत कोणीतीही हानी झाली नाही. ज्या मजल्यावर आग लागली होती तिथे किरकोळ नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाच्या किमान चार गाड्या आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि रात्री 9.35 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. एका खोलीतील घरातील सामान आणि लाकडी फर्निचरला ही आग लागली. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

Jacqueline Fernandez पुन्हा चर्चेत

जॅकलिन फर्नांडिसच्या वर्क फ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, ती लवकरच अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस व्यतिरिक्त रवीना टंडन, दिशा पटानी, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, संजय दत्त, तुषार कपूर, राजपाल यादव, परेश रावल, सुनील शेट्टी आणि लारा दत्ता असे अनेक कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याशिवाय ही अभिनेत्री फतेह या चित्रपटातही दिसणार आहे.

जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे वादग्रस्त प्रकरणात अडकली. तुरूंगात असलेला सुकेश अनेकदा पत्र लिहून जॅकलीनवर कधी प्रेम व्यक्त करतो तर कधी गंभीर आरोप करत असतो. त्यामुळे अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात कायम असते.

News Title- building in Bandra West, where Bollywood actress Jacqueline Fernandez lives, caught fire in the night
महत्त्वाच्या बातम्या –

“बारामतीची ओळख शरद पवार साहेबांमुळे, म्हणून…”

“मोदी-शहा महाराष्ट्रामध्ये येऊन मनोरंजन करतात”

‘त्या खोलीत रात्रभर…’; अभिनेत्री करिना कपूरने करिश्माबद्दल केला सर्वात मोठा खुलासा

नवनीत राणा यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

“भारत माता की जय मान्य नाही”; ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now