शिवभक्तांनो उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी; जाणून घ्या अधिक

On: June 22, 2024 1:13 PM
IRCTC Travel Package Jyotirlingas Of Madhya Pradesh
---Advertisement---

IRCTC Travel Package | पावसाळ्यात बरेच जण फिरायला जाण्याचा प्लॅन आखत असतात. पर्यटकांना सर्वाधिक आकर्षण हे डोंगराळ प्रदेशात असते. तर, काही जण धार्मिक यात्रा करतात. आता शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयआरसीटीसीने स्वस्तात मस्त एक खास टूर पॅकेज आणला आहे.

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला महाकालेश्वर मंदिर, सांदीपनी आश्रम, चिंतामण गणेश मंदिर, हरसिद्धी मंदिर आणि उज्जैनचे मंगलनाथ मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुम्हाला इंदूरच्या प्रसिद्ध मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची खास संधी मिळणार आहे.

आयआरसीटीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही देशातील प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता आणि हे टूर पॅकेज अगदी तुमच्या बजेटमध्ये बसणारे आहे.

किती दिवसाचे असणार टूर पॅकेज?

आयआरसीटीसीचे हे टूर (IRCTC Travel Package)पॅकेज भुवनेश्वर विमानतळावरून सुरू होईल. येथून प्रवाशांना विमानाने उज्जैन आणि नंतर इंदूरला नेले जाईल. हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे. 6 सप्टेंबर 2024 पासून हे पॅकेज सुरू होईल.

यामध्ये तुम्हाला 5 दिवसांसाठी प्रवास, राहण्याची सुविधा आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. हे टूर पॅकेज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘SCBA53’ या कोडसह उपलब्ध आहे.

किंमत काय असणार?

तुम्ही या पॅकेज अंतर्गत एकाच (IRCTC Travel Package)व्यक्तीसाठी तिकीट बुक केले, तर तुम्हाला 43,220 रुपये भरावे लागतील.दोन व्यक्तींसाठी 34,445 प्रतिव्यक्ती आणि तीन व्यक्तींसाठी बुक केले तर प्रतिव्यक्ती तुम्हाला 33,830 रुपये भरावे लागतील.तुमच्यासोबत जर 5 ते 11 वर्षापर्यंत मूल सोबत असेल आणि तुम्हाला वेगळा बेड हवा असेल तर यासाठी तुम्हाला 28,855 रुपये भरावे लागतील.

ऑनलाइन बुकिंग कशी करणार?

तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC Travel Package) अधिकृत वेबसाईट http://www.irctc.co.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. तसंच 8287932227 या क्रमांकावर संपर्क करूनही अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

News Title – IRCTC Travel Package Jyotirlingas Of Madhya Pradesh

महत्त्वाच्या बातम्या-

“मनोज जरांगेंची उंची आहे का?, कोण कोणाला पाडतं दाखवून देऊ”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

ह्युंदाई कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद होणार

सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!

अगदी वरचा देव जरी आला तरी… उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड

ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

 

Join WhatsApp Group

Join Now