मुंबई | कोरोना (Corona) काळातील निर्णयाप्रकरणी चहल यांची चौकशी (Inquiry) करण्यात येणार आहे. ईडी (ED)ने मुंबई महापालिकेचे (BMC) चहल यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे चहल आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.
चौकशीला जाण्याआधी इक्बाल सिंह चहल यांनी मोठी मागणी केलीये. राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी इक्बाल चहल यांनी केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. काही अतिरिक्त आयुक्त मुंबई पालिका इक्बालसिंह चहल यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते.
कोरोना काळातील कामे आणि घेतलेले निर्णय याबाबत चहल यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे याच कामांचा आढावा घेण्यासाठी आणि ईडीला उत्तर देण्यासाठी हा आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, कोरोना (Corona) काळात मुंबईत जी कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospital) उभारण्यात आली त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






