तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

On: March 18, 2024 11:49 AM
NPCIL Recruitment 2024
---Advertisement---

IPPB Recruitment 2024 l इंडिया पोस्टमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये एक्झिक्युटिव्ह यासह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत ते या अधिकृत वेबसाइट ippbonline.com द्वारे अर्ज करू शकतात. IPPB च्या या भरतीद्वारे एकूण 47 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवार 5 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. तुमचंही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच आहे.

IPPB Recruitment 2024 l किती पदे भरती जाणार? :

IPPB भरती मोहिमेद्वारे एकूण 47 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 21 पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, 4 रिक्त पदे EWS प्रवर्गासाठी, 12 पदे OBC प्रवर्गासाठी, 7 पदे एससी प्रवर्गासाठी आणि 3 पदे एसटी प्रवर्गासाठी असणार आहेत.

IPPB मध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? :

जे उमेदवार IPPB भर्ती 2024 साठी अर्ज करत आहेत त्यांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी ippbonline.com या वेबसाईटला भेट द्या.

IPPB मध्ये फॉर्मसाठी अर्ज शुल्क किती असणार? :

SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 150 रुपये भरावे लागतील. तर इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी 700 रुपये आहे.

IPPB Recruitment 2024 l अशाप्रकारे करा अर्ज :

– सर्वात प्रथम IPPB च्या ippbonline.com या वेबसाइटला भेट द्या.
– त्यानंतर होमपेजवरील करिअर पर्यायावर क्लिक करा.
– पुढे नोंदणी करा आणि अर्ज भरा.
– त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– त्यानंतर अर्ज फी भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
– सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.

News Title : IPPB Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी: इलेक्टोरल बाँड्सवर ‘सर्वोच्च’ सुनावणी; CJI म्हणाले, “SBI ला माहिती द्यावीच लागेल”

तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!

“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल”, भाजपची बोचरी टीका

‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now