IPL Umpires Salary l इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानली जाते. खेळाडूंसाठी येथे कोट्यवधींचे करार होतात, मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, पंचांना या स्पर्धेत किती मानधन मिळते? आयपीएलमध्ये पंचगिरी करणे ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसून, त्यासाठी चांगले आर्थिक मोबदला देखील मिळतो.
एलिट पॅनेल पंचांचा पगार किती? :
आयपीएलमध्ये पंचांना दोन गटांमध्ये विभागले जाते. एलिट पंच आणि डेव्हलपमेंटल पंच. एलिट पॅनेल पंच हे ICC च्या आंतरराष्ट्रीय पंचांपैकी असतात. त्यांना आयपीएल दरम्यान मोठी फी दिली जाते.
– एलिट पंचांना प्रति सामन्याचे मानधन: ₹1,98,000
– दैनिक भत्ता: ₹12,500
– हंगामभर मिळणारी अतिरिक्त रक्कम: ₹7,33,000
– प्रवास व निवास भत्ता: स्वतंत्रपणे मिळतो
IPL Umpires Salary l डेव्हलपमेंटल पंचांना किती पैसे मिळतात? :
डेव्हलपमेंटल पंच हे प्रामुख्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये पंचगिरी करणारे असतात. त्यांना अनुभव वाढवण्यासाठी आणि भविष्यात एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये संधी दिली जाते.
– डेव्हलपमेंटल पंचांना प्रति सामन्याचे मानधन: ₹59,000
– प्रवास व निवास भत्ता: स्वतंत्रपणे दिला जातो
– कोणते पंच एलिट पॅनेलमध्ये आहेत?
सध्या आयपीएल 2024 हंगामासाठी एलिट पॅनेलमध्ये हे प्रमुख पंच आहेत:
अनिल चौधरी
शमसुद्दीन
ख्रिस गॅफनी
नितीन मेनन
के.एन. अनंतपद्मनाभन
पॉल रायफल
ब्रूस ऑक्सेनफोर्ड
आयपीएलमध्ये पंच हे फक्त सामना नियंत्रित करत नाहीत तर त्यांना उत्तम मोबदला देखील मिळतो. एलिट पॅनेल पंच हंगामभर लाखो रुपये कमावतात, तर डेव्हलपमेंटल पंचांसाठीही ही मोठी संधी असते.






