डिमेरिट पॉइंटबद्दल BCCI चा मोठा निर्णय, IPL कर्णधारांना मिळणार दिलासा?

On: March 21, 2025 11:02 AM
IPL 2025 New Rule No Match Ban
---Advertisement---

IPL 2025 | आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट मंडळ (BCCI) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे स्लो ओव्हररेटसाठी कर्णधारांवर सामन्याची बंदी लागू होणार नाही. या निर्णयामुळे IPL कर्णधारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (IPL 2025)

स्लो ओव्हररेटवर बंदी नाही, फक्त दंड आणि डिमेरिट पॉइंट

2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला स्लो ओव्हररेटच्या कारणामुळे एका सामन्याला मुकावे लागले होते. यावर्षी 23 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) सामन्यात हार्दिक खेळणार नाही, ही शिक्षा मागच्या पर्वातील आहे. मात्र BCCI ने यावर्षीपासून नियम बदलल्याने, हार्दिकसारखी बंदी इतर कर्णधारांवर लागू होणार नाही.

20 मार्च रोजी सर्व IPL कर्णधारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत BCCI ने यासंबंधी स्पष्टता दिली. यापुढे स्लो ओव्हररेटसाठी कर्णधाराला सामन्याला मुकावे लागणार नाही, मात्र त्याच्या खात्यात डिमेरिट पॉइंट जमा होतील.

डिमेरिट पॉइंट्स संबंधित कर्णधाराच्या नावावर 3 वर्षे कायम राहतील. जर लेव्हल-2 प्रकारातील स्लो ओव्हररेट प्रकरण असेल, तर थेट 4 डिमेरिट पॉइंट्स दिले जातील. यानंतर मॅच रेफरी कर्णधाराची संपूर्ण मॅच फी कपात करू शकतात.

लाळेचा वापर व दोन चेंडूंबाबतही BCCI ची स्पष्टता

या बैठकीत लाळ वापरून चेंडूला चमक देणे प्रतिबंधित राहील, याबाबतही निर्णय घेण्यात आला. तसेच दोन चेंडू वापरण्याबाबत कोणताही बदल न करण्याचेही BCCI ने स्पष्ट केले. (IPL 2025)

मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्यावरही सामन्याची बंदी घालण्यात आली होती. BCCI च्या नव्या नियमांनुसार, अशा बंदी आता होणार नाहीत, मात्र नियम मोडल्यास आर्थिक दंड आणि डिमेरिट पॉइंट्सची शिक्षा कायम राहणार.

Title : IPL 2025 New Rule No Match Ban for Slow Over Rate 

 

Join WhatsApp Group

Join Now