Hardik Pandya l आयपीएल 2025 (IPL 2025) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे 23 मार्च रोजी चेन्नई (Chennai) आणि मुंबई (Mumbai) यांच्यातील पहिला सामना चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) होईल. पण, मुंबईसाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात खेळू शकणार नाही.
हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी :
पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्या चेन्नईविरुद्ध खेळताना दिसणार नाही, कारण त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला कर्णधार हार्दिक पंड्याशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना करावा लागणार आहे.
Hardik Pandya l बंदीचे कारण :
हार्दिक पंड्यासाठी मागील हंगाम खूप वाईट ठरला होता. हंगामातील शेवटच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने षटकांची गती कमी राखली होती. गेल्या हंगामात, हार्दिकला तीन वेळा षटकांची गती कमी राखल्याबद्दल (Slow Over Rate) दोषी ठरवण्यात आले होते. त्याच्या संघाने वेळेवर षटके पूर्ण केली नाहीत, असे तीन वेळा घडले. गेल्या हंगामातील सामन्यात तिसऱ्यांदा चूक केल्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. पण, मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे त्याला ही शिक्षा पूर्ण करता आली नाही. आता आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला ही शिक्षा भोगावी लागेल. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही.
मागील हंगामातील खराब कामगिरी :
हार्दिक पंड्यासाठी मागचा हंगाम खूप निराशाजनक होता. त्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स संघाने साखळी फेरीत 14 पैकी 10 सामने गमावले आणि गुणतालिकेत शेवटचे स्थान मिळवले. रोहित शर्माकडून (Rohit Sharma) कर्णधारपद काढून घेतल्यानंतर पंड्याला चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. आता, या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी मुंबईला नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे.
News title : IPL 2025: Mumbai Indians Suffer Blow, Hardik Pandya Out of First Match






