IPL 2025 | आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्याच्या तारखेत बीसीसीआयने अचानक बदल केला आहे. कोलकाता पोलिसांच्या विनंतीनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे आता केकेआर आणि लखनौ यांच्यातील सामना नव्या दिवशी पार पडणार आहे. (IPL 2025)
केकेआर-लखनौ सामना 6 ऐवजी 8 एप्रिलला
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवण्यात येणार होता. सुरुवातीला हा सामना 6 एप्रिल रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर नियोजित होता. मात्र बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, आता हा सामना 8 एप्रिल रोजी होणार आहे. दुपारी 3:30 वाजता खेळवला जाणारा हा सामना, IPL 2025 चा त्या दिवशीचा पहिला डबल हेडर असेल.
या बदलामुळे रविवारी, म्हणजे 6 एप्रिल रोजी फक्त एकच सामना होईल, तर मंगळवारी 8 एप्रिलला दोन सामने पाहायला मिळणार आहेत. सायंकाळी 7:30 वाजता दुसरा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
राम नवमीमुळे पोलिस सुरक्षा अपुरी, सामन्याचा दिवस पुढे ढकलला
बीसीसीआयने 28 मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, कोलकाता पोलिसांकडून मिळालेल्या विनंतीनंतर हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. 6 एप्रिल रोजी राम नवमी साजरी होत असल्याने पोलिस दलाची पूर्ण वेळ सुरक्षा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआयने पोलिसांच्या सूचनेचा विचार करून सामना 8 एप्रिलला हलवण्याचा निर्णय घेतला. (IPL 2025)
प्रेस नोटद्वारे बीसीसीआयने सांगितले की, केवळ या एका सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. इतर सर्व सामने नियोजित वेळेनुसारच पार पडतील.
Title : IPL 2025 KKR vs LSG Match Rescheduled to April 8






