Punjab Kings vs RCB | आयपीएल 2025 अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात बहुप्रतीक्षित अंतिम सामना रंगणार आहे. पंजाबने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला असला, तरी त्यांच्यासमोर अजूनही काही मोठी आव्हानं आहेत. संघातील काही चुका त्यांच्या जेतेपदाच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकतात. (Punjab Kings vs RCB Live Update)
फिरकी गोलंदाजीतील अपयश :
पंजाब किंग्जच्या (PBKS) फिरकीपटूंनी या हंगामात अपेक्षित कामगिरी केलेली नाही. युजवेंद्र चहलसारखा (Yuzvendra chahal) अनुभवी खेळाडूही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये फारसा प्रभावी ठरलेला नाही. विशेषतः क्वालिफायर-2 मध्ये आणि मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याला विकेट मिळवण्यासाठी झगडावं लागलं. अंतिम सामन्यात खेळपट्टी मंद असण्याची शक्यता आहे, त्यामुळे फिरकी गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जर चहल आणि इतर फिरकीपटू विकेट मिळवण्यात अपयशी ठरले, तर आरसीबीची मजबूत फलंदाजी पंजाबवर भारी पडू शकते.
प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य ही सलामी जोडी नॉकआउट सामन्यांमध्ये अपयशी ठरली आहे. विशेषतः पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांच्या अपयशामुळेच संघाला पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात, जिथे मानसिक दबाव अधिक असतो, तिथे दमदार सुरुवात देणे अत्यंत आवश्यक असते. जर ही जोडी पुन्हा अपयशी ठरली, तर संपूर्ण फलंदाजी क्रमावर दबाव वाढू शकतो.
Punjab Kings vs RCB | फलंदाजीचा अति-अवलंब श्रेयस अय्यरवर :
कर्णधार श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या अर्धशतकामुळेच पंजाबने मुंबईला पराभूत केले. मात्र, हीच गोष्ट चिंतेची बनते, कारण संघाची फलंदाजी अतीव प्रमाणात अय्यरवर अवलंबून आहे. जर तो लवकर बाद झाला, तर इतर फलंदाजांवर अधिक जबाबदारी येईल. त्यामुळे मध्य आणि खालच्या फळीतील फलंदाजांनीही पुढे येत संघाला साथ देणे आवश्यक ठरेल. (Punjab Kings vs RCB Final)
आरसीबीची सध्याची लय पाहता, विराट कोहली, फिल साल्ट, जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे पंजाबने आपल्या कमकुवत बाजूंवर नियंत्रण मिळवलं नाही, तर आरसीबीसाठी आयपीएल इतिहासातील पहिली ट्रॉफी जिंकण्याची ही उत्तम संधी ठरू शकते.






