IPL 2025 चं वेळापत्रक बदलणार?, टेंशन वाढवणारी बातमी समोर

On: March 19, 2025 3:10 PM
LSG vs PBKS 2025
---Advertisement---

IPL 2025 | आयपीएल 2025 हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआय (BCCI) सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. 6 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक बदलेल अशी शक्यता आहे. या बदलामागील प्रमुख कारण रामनवमीचा (Ram Navami) सण असल्याचे सांगितले जात आहे. (IPL 2025)

6 एप्रिलच्या सामन्यात बदल का होणार?

आयपीएल 2025 चा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यात होणार आहे. मात्र, 6 एप्रिलला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) होणाऱ्या केकेआर-लखनौ सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या दिवशी रामनवमीचा सण असल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने बीसीसीआयला या सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या दिवशी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

BCCI वेळापत्रक बदलण्याच्या विचारात?

काही मीडिया रिपोर्टनुसार, CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली (Snehasish Ganguly) यांनी सांगितले की, “आम्ही पोलिस आणि प्रशासनाशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की त्या दिवशी अतिरिक्त सुरक्षा पुरवणे कठीण होईल. त्यामुळे आम्ही बीसीसीआयला सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे.”

दरम्यान, वेळापत्रक आधीच ठरवलेले असल्याने सामन्याची वेळ बदलणे कठीण ठरू शकते. त्यामुळे सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा पर्याय देखील विचारात घेतला जात आहे. बीसीसीआय सध्या संबंधित संघ आणि लॉजिस्टिक टीमशी चर्चा करत असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. (IPL 2025)

गेल्या हंगामातही रामनवमीच्या दिवशी कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सामना सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा शेड्यूल करण्यात आला होता. यंदा 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या उद्घाटन सामन्यासाठी बीसीसीआयने मोठ्या ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले आहे.

Title : IPL 2025 BCCI May Reschedule KKR vs LSG Match 

 

Join WhatsApp Group

Join Now