IPL 2024 Start Date l या तारखेपासून होणार IPL च्या सामन्यांचा जल्लोष सुरु

On: January 10, 2024 2:17 PM
IPL 2024 Start Date
---Advertisement---

IPL 2024 Start Date l क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. क्रिकेट विश्वात महत्वाची मानली जाणाऱ्या इंडियन प्रीमियल लीग (IPL) संदर्भात महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. इंडियन प्रीमियल लीग (IPL) मार्च महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.

दोन शहरांमध्ये होणार WPL चे सामने :

मात्र इंडियन प्रीमियल लीगच्या (IPL) आधी महिला प्रीमियर लीग (WPL) चे सामने होणार आहेत. WPL फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. अशी माहिती एका अहवालातून माहिती समोर आली आहे. तसेच WPL चे सामने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून ते मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत खेळवले (IPL 2024 Start Date) जाणार आहेत. WPL चे सामने हे फक्त दोन शहरांमध्ये होणार आहेत. हे सामने दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आयोजित केले जाणार असल्याचे समोर येत आहे.

IPL 2024 Start Date l तसेच 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होणार आहेत असे सांगण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे आयपीएलमध्ये (IPL 2024 Start Date) सर्व 10 फ्रँचायझी आपापल्या घरच्या मैदानावर म्हणजे 10 मैदानांवर सामने खेळतील, याशिवाय राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जचे सामने त्यांच्या घरच्या मैदानाव्यतिरिक्त इतर दोन मैदानांवरही होतील.

इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आयपीएल सुरू होईल?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारी 2024 पासून पाच (IPL 2024 Start Date) सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 11 मार्च 2024 ला संपणार आहे. या मालिकेनंतर खेळाडूंना सुमारे दीड आठवड्यांचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर आयपीएलचा जल्लोष सुरू होणार आहे. मात्र IPL च्या वेळापत्रकाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन IPL वेळापत्रक तयार केले जाणार :

आयपीएलचे वेळापत्रक (IPL 2024 Start Date) लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे यावर्षी मार्च ते मे दरम्यान सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

अशा परिस्थितीत आयपीएल सामने आणि निवडणुकी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत समतोल राहावा आणि कायदा आणि सुव्यवस्थेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वेळापत्रक तयार केले जाईल.

महत्वाच्या घडामोडी :

Shivsena MLA Disqualification Case l ‘महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार’; बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now