वाचनीय: CSK त ऋतु’राज’! मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत; पण पांड्या ‘लक्ष्य’ का?

On: March 26, 2024 12:04 PM
IPL 2024
---Advertisement---

IPL 2024 | जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल (IPL 2024) म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी जणू काही एक सणच… वर्षभर चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलचा यंदाचा हंगाम विविध कारणांनी महत्त्वाचा आहे. चार संघ आपल्या नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. तर प्रथमच 20 कोटींहून अधिक रूपयांच्या किंमतीचे खेळाडू मैदानात आहेत. मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने विक्रमी 24.75 कोटींना खरेदी केले. तर पॅट कमिन्सवर (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबादने 20.5 कोटींचा वर्षाव केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेले चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत.

हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) कर्णधारपदाचा राजीनामा देत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडवर ही जबाबदारी सोपवली. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई या दोन्हीही संघांनी 1-1 सामना खेळला आहे. चेन्नईने विजयी सलामी दिली तर मुंबईने आपली परंपरा कायम राखत पहिला सामना गमावला.

मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत पण…

मुंबईने पहिला सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत यजमान गुजरातने बाजी मारली. हा सामना आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील बहुचर्चित सामना ठरला. कारण हार्दिकने गुजरातच्या संघातून बाहेर पडत मुंबईच्या संघात घरवापसी केली. पण, अहमदाबाद येथे प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमने हार्दिक पांड्याला आरसा दाखवला.

खरं तर रोहित शर्मा अद्याप भारतीय संघाचा कर्णधार आहे. पण, पांड्याकडे मुंबईच्या संघाचे नेतृत्व सोपवल्यामुळे चाहत्यांमध्ये रोष आहे, तो दिसूनही आला. नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या मैदानात येताच चाहत्यांनी ‘रोहित रोहित’ अशा घोषणांचा पाऊस पाडला. हार्दिकने अनेकदा फिल्ड सेट करताना रोहितला सीमारेषेजवळ पाठवले, याचा दाखला देत सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकवर टीका होत आहेत. मुंबईचा कर्णधार ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असतात अतिउत्साही आणि संतापलेल्या चाहत्यांनी हार्दिकबद्दल अपशब्द वापरले.

IPL 2024 चा थरार

दरम्यान, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. आयपीएलच्या सतराव्या हंगामात दोन्हीही दिग्गज केवळ एक खेळाडू म्हणून मैदानात आहे. पण, रोहितच्या समर्थकांमध्येच संतापाचे वातावरण का आहे? हा प्रश्न उद्भवतो. मात्र, याचे उत्तर देखील तितकेच सोपे आहे. रोहित अद्याप टीम इंडियाचा कर्णधार असताना त्याला मुंबईच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले. तसेच हार्दिककडे गुजरातच्या संघाची धुरा असताना देखील तो मुंबईच्या संघात आल्याने दोन्हीही संघाचे चाहते दुखावले आहेत. याचा प्रत्यय अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात आला.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईच्या संघाची धुरा असली तरी वेळोवेळी धोनी त्याला मार्गदर्शन करताना दिसला. रोहितने देखील पांड्याला आपला अनुभव शेअर करताना काही सल्ले दिले. पण, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक रोहितला सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा करतो. हे पाहून रोहितनेही आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. याशिवाय सामना झाल्यानंतर देखील रोहित नाराज दिसला, ज्याचे साक्षीदार नरेंद्र मोदी स्टेडियमवरील 80 हजार चाहते झाले. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हार्दिक आणि रोहित दोघेही ट्रेन्ड करत आहेत. त्याचे कारण मुळात एकच ते म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर नकोसा थरार. त्यामुळे मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर देखील असेच चित्र अनुभवायला मिळेल यात शंका नाही.

News Title- IPL 2024 Mumbai Indians captain hardik pandya vs former captain rohit sharma atmosphere

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार!

विराटने पुन्हा दाखवून दिलं; भर मैदानात व्हिडिओ कॉलवर दिला फ्लाइंग किस

ऐश्वर्याने अखेर मौन सोडलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा!

“आम्ही फक्त लढाई हरलोय पण…”, गब्बर धवनने रणशिंग फुंकले!

कोहलीसाठी काहीपण! चाहत्याने भर मैदानात केलं असं काही की प्रेक्षक पाहतच राहिले

Captain Rohit Sharma Captain Ruturaj Gaikwad Chennai Super Kings CSK Captain Ruturaj Gaikwad Hardik Pandya Hardik Pandya Captain Hardik Pandya IPL 2024 Hardik Pandya join Mumbai Indians Hardik Pandya Latest News Hardik Pandya New Captain Hardik Pandya News hardik pandya replaces rohit sharma Hardik Pandya Update IPL IPL 17 Ipl 17th Season IPL 2024 News MS Dhoni MS Dhoni ipl MS Dhoni ipl 2024 MS Dhoni ipl match MS Dhoni MS Dhoni IPL Mumbai Indians Rohit Sharma Rohit Sharma Captaincy Rohit Sharma Mumbai Indians Rohit Sharma News Ruturaj gaikwad Ruturaj Gaikwad CSK Ruturaj Gaikwad CSK Captain Ruturaj Gaikwad New Captain आयपीएल आयपीएल 2024 आयपीएल बातम्या आयपीएल लिलाव 2024 आयपीएल वेळापत्रक आयपीएल सामने ऋतुराज गायकवाड कर्णधार रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग महेंद्रसिंह धोनी मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या कोणत्या संघात हार्दिक पांड्या मुंबई इंडियंस हार्दिक पांड्या मुंबईच्या संघात हार्दिक पांड्याचा संघ कोणता

Join WhatsApp Group

Join Now