IPL 2024 | यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्याची अधिक चर्चा होत आहे. मुंबईच्या संघाला पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पांड्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक सामन्यात हार्दिक क्रिकेट चाहत्यांच्या टार्गेटवर येत आहे. त्यातच मुंबईने आपली परंपरा कायम ठेवत सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत.
काल (2 एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान मुंबईसाठी ट्रेंन्ट बोल्ट काळ ठरला. त्याने रोहित शर्मा आणि नमन धीर यांना दोन चेंडूत बाहेरचा रस्ता दाखवला. अखेर मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 125 धावा करू शकला.
हार्दिक पांड्याची पोस्ट चर्चेत
मुंबईने दिलेल्या 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने सहज मुंबईला नमवलं. राजस्थानने 15.3 षटकांत 4 बाद 127 धावा करून विजय प्राप्त केला. राजस्थानकडून रियान परागने 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 39 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी केली. मुंबईचा हा तिसरा पराभव ठरला. यामुळे (IPL 2024) पुन्हा एकदा कर्णधार हार्दिकला टार्गेट केलं जातंय.
त्यातच हार्दिकने आपल्या सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. “मुंबई संघाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू, पुढे जात राहू.”, अशी पोस्ट हार्दिकने केली आहे. या पोस्टची आता चर्चा होऊ लागली आहे.
View this post on Instagram
MI Vs DC सामन्यात मुंबई विजयी होणार?
दरम्यान, मुंबईचा पुढचा पुढचा सामना (IPL 2024 ) हा दिल्लीसोबत होणार आहे. येत्या 7 एप्रिलला मुंबई आणि दिल्ली यांच्यात लढत होईल. हा सामना देखील वानखेडे स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता खेळला जाईल. आता या सामन्यात मुंबईला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावं लागणार आहे.
रोहित शर्मासोबतच इशान किशन आणि इतर खेळाडूंना कस लावावा लागणार आहे. दिल्लीचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यावर भर देईल. दिल्लीने चेन्नईला 20 धावांनी नमवत विजयरथ पुढे नेला. त्यामुळे मुंबईला दिल्ली तगडं आव्हान देऊ शकते.
News Title- IPL 2024 Hardik Pandya post in discussion
महत्त्वाच्या बातम्या –
पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलची धमाकेदार एन्ट्री, या टॉप 5 खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरु
“राम कदम तमाशातील नाच्याप्रमाणे…”, ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका
उद्या भारतात दिग्गज ऑटो कंपन्यांशी तगडी स्पर्धा होणार; SUV Taisor लाँच होणार
एप्रिल महिन्यात तापमान कसं असणार?, हवामान विभागाची मोठी अपडेट समोर
जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती






