“धोनीने खेळूच नये, चेन्नईने त्याच्या जागी..”; धोनी शून्यावर बाद झाल्याने ‘हा’ खेळाडू संतापला

On: May 6, 2024 12:50 PM
MS Dhoni
---Advertisement---

IPL 2024 | महेंद्रसिंह धोनी हे नाव माहीत नसेल असा क्वचितच भारतात सापडेल. सध्या देशात आयपीएलचा हंगाम सुरू आहे. यावर्षी दिग्गज संघ मुंबई, चेन्नई, आरसीबी यांना छाप सोडता आली नाही. मुंबई आणि बंगळुरूचं तर स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर, चेन्नई अजूनही स्पर्धेत टिकून आहे.

काल ( 5 मे) चेन्नईचा पंजाबविरुद्ध सामना झाला. या सामन्यात चेन्नईचे खेळाडू झटपट आऊट होऊन पव्हेलियनमध्ये परतले. त्यात फिनिशर महेंद्रसिंह धोनी तर शून्यावर बाद होऊन परतला. एमएस धोनीने आतापर्यंतच्या टी-20 कारकिर्दीत प्रथमच 9व्या क्रमांकावर फलंदाजी केली.

चेन्नईने या सामन्यात पंजाबला हरवलं असलं तरी धोनीच्या कामगिरीमुळे एक दिग्गज खेळाडू चांगलाच संतापला आहे. त्याने तर थेट धोनीने खेळूच नये, असं म्हटलं आहे. हा खेळाडू दूसरा-तिसरा कुणी नसून भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग आहे.

धोनी बहुतेक सामन्यांमध्ये 1-2 षटके शिल्लक असताना फलंदाजीला येतो. पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या आधी मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी आले.यावरुन हरभजन सिंग चांगलाच संतापला आहे.

काय म्हणाला हरभजन सिंग?

“धोनी जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर चेन्नईने त्याच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज आणावा. जर एमएस धोनीला (MS Dhoni) 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्याने खेळू नये. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाजाचा समावेश करणे चांगले आहे.”, असं हरभजन सिंग म्हणाला आहे.

तसंच पुढे हरभजन सिंग म्हणाला की, “शार्दुल ठाकूर कधीही धोनीसारखे फटके मारू शकत नाही आणि धोनीने ही चूक का केली हे मला समजत नाही. त्याच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही आणि 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याचा निर्णय दुसऱ्याने घेतला हे मी मान्य करणार नाही. आज जरी चेन्नईने सामना जिंकला ( IPL 2024) असला तरी मी धोनीला फोन करेन. लोकांना जे हवं ते म्हणू द्या. जे योग्य आहे तेच मी सांगेन”, अशी नाराजी हरभजन सिंग याने व्यक्त केली आहे.

News Title –  IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni

महत्त्वाच्या बातम्या-

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”

कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला? नेमकं काय म्हणाला अभिनेता…

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ मंत्र्याच्या पीएच्या घरी मिळाले ढीगभर पैसे; अधिकारीही चक्रावले

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला

Join WhatsApp Group

Join Now