Iphone New Prices | देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलैरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मोबाईल फोन, चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर अॅपल कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने (Iphone New Prices ) सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.
आयफोन 13, 14 आणि 15 च्या किमती झाल्या कमी
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रो, प्रो मॅक्स यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.मेड इन इंडिया आयफोन (iPhone) 13, 14 आणि 15 च्या दरातही 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे.
आयफोन एसई (iPhone SE) च्या किमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ॲपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या काही मॉडेल्समध्ये किमती कमी केल्या आहेत. याचा ग्राहकांना मोठा फायदा (Iphone New Prices ) झाला आहे.
आयफोनचे नवे दर जाणून घ्या
आयफोन एसई (iPhone SE) – 47600 रुपये
आयफोन13 (iPhone 13) – 59,600 रुपये
आयफोन 14 (iPhone 14) – 69,600 रुपये
आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) – 79,600 रुपये
आयफोन 15 (iPhone 15) – 79,600 रुपये
आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) – 89,600 रुपये
आईफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) – 1,29,800 रुपये
आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) – 1,54,000 रुपये (Iphone New Prices )
News Title – Iphone New Prices
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!
‘भावी मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले बॅनर
“गुजरातमधून तडीपार केलेला माणूस..”; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
अजितदादांना झटका! बड्या नेत्याची शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी






