INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

On: December 17, 2023 2:07 PM
INDvSA
---Advertisement---

INDvSA | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या वन डे सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करम याने नाणेफेक जिंकली असून त्याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात भारताकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

भारतीय संघात कोणते बदल?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvSA) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारती संघाला नवीन सलामीवीर मिळणार आहे.  या सामन्यासाठी नवीन चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे. आज भारतीय संघाकडून एक 22 वर्षाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. भारतीय संघाची फलंदाजी सुरु झाल्यानंतर हा खेळाडू सलामीला उतरलेला दिसेल.

आजच्या सामन्यात (INDvSA) सलामीला उतरणारा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून साई सुदर्शन (Sai Sudarshan) आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि साई सुदर्शन ही नवी युवा जोडी आज सलामीला उतरेल. भारतीय संघात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे संजू सॅमसनची (Sanju Samson) अंतिम 11 खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली आहे.

गोलंदाजांची कमान कुणाकडे?

भारताच्या वेगवान गोलंदाजीची कमान यावेळी अर्शदीप सिंग (Arshadeep Singh), आवेश खान (Avesh Khan) आणि मुकेश कुमार(Mukesh Kumar) यांच्यावर असणार आहे. या मालिकेमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे भारताच्या नव्या दमाच्या गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवण्याची तसेच स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण संघाचा विचार केला तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील फक्त तीनच खेळाडू आजच्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहेत.

दोन्ही संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश-

दक्षिण आफ्रिका (अंतिम 11): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी

भारत (अंतिम 11): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

News Title: indvsa first odi india will open with new opener

महत्त्वाच्या बातम्या-

Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

Madhuri Dixit | त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये, माधुरीने केला मोठा गौप्यस्फोट

Job Alert | रेल्वेमध्ये मोठी भरती, परिक्षा आणि मुलाखत नाही थेट होणार निवड

Suryakumar Yadavच्या बायकोच्या एका पोस्टमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ

‘या’ एका कारणामुळे Allu Arjun ने 10 कोटींची ऑफर धुडकावली!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now