‘माझी निवडणुकीची खाज आता भागली’; उदयनराजेंचं सूचक वक्तव्य

On: October 14, 2023 12:02 PM
---Advertisement---

सातारा | भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी आता पुन्हा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निवडणुकीची हौस भागली, असं उदयनराजे म्हणालेत.

माझी निवडणुकीची हौस भागली. शासनाचं निवृत्तीचं वय असतं, तेच राजकारणात हवं, असं उदयनराजे म्हणाले आहेत. तर असाच काहीसा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दिला आहे. मी आता प्रचारक म्हणून काम करतो. बस झालं आता, माझं वैयक्तिक मत आहे की शासनात कर्मचाऱ्यांचं जे निवृत्तीच वय असतं, ते खरंतर राजकारण्यांनासुद्धा लागू झालं पाहिजे, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं आहे.

शरद पवारांनी खरं तर मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलं पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदे, एवढी वर्षे उपभोगली, आता बस करावं, असा सल्ला त्यांनी शरद पवारांना दिला आहे.

दरम्यान, सातारा नगरपालिकेबाबत भाजप आमदार शिवेंद्रराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, सातारा नगरपालिकेची ईडीची चौकशी लावावी, असा उपरोधिक टोला उदयनराजेंनी या वेळी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now