टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढत; सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ‘हे’ समीकरण जिंकावंच लागेल!

On: February 24, 2026 11:55 AM
T20 World Cup
---Advertisement---

T20 World Cup | टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) च्या सुपर-8 टप्प्यात भारतीय संघाची वाट अधिकच कठीण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा नेट रन रेट (Net Run Rate) 3.800 इतका घसरला आहे. त्यामुळे आता केवळ विजय पुरेसा ठरणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक बनले आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या विजयाची गरज :

ग्रुप 1 मध्ये भारताचे झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध दोन सामने बाकी आहेत. उपांत्य फेरी गाठायची असेल तर हे दोन्ही सामने जिंकणे भाग आहे. मात्र गुणतालिकेत बरोबरी झाल्यास नेट रन रेट निर्णायक ठरणार असल्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे.

जर भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखले, तर लक्ष्य वेगाने गाठणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. उदाहरणार्थ, झिम्बाब्वेने 90 धावा केल्या तर भारताने ते लक्ष्य अवघ्या 9 षटकांत पूर्ण करणे गरजेचे आहे. 150 धावांचे लक्ष्य असेल तर 11 षटकांत सामना संपवावा लागेल. 180 ते 200 धावांचा स्कोर असेल, तर 12 ते 15 षटकांत विजय मिळवणे आवश्यक ठरेल. लक्ष्य जितके मोठे, तितकी वेगवान फलंदाजी आणि उच्च रनरेटची गरज वाढणार आहे.

T20 World Cup | पहिल्यांदा फलंदाजी केल्यास समीकरण कठीण :

जर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर नेट रन रेट सकारात्मक करण्याचे आव्हान अधिक कठीण होईल. अशा वेळी भारताला किमान 220 ते 250 पेक्षा जास्त धावा उभाराव्या लागतील. त्यानंतर प्रतिस्पर्ध्याला 100-120 धावांच्या आत रोखणे गरजेचे ठरेल. विरोधी संघाला बाद करण्यात यश मिळाल्यास जास्त षटकांचा फायदा होऊन रनरेट सुधारू शकतो. (T20 World Cup)

पहिल्या सामन्यात भारतीय संघ (Team India) ऑलआउट झाल्यामुळेच नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे पुढील सामन्यात आक्रमक आणि नियोजनबद्ध कामगिरी करणे अत्यंत आवश्यक आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर विजयासोबतच रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा करणे हेच खरे मोठे आव्हान ठरणार आहे.

News Title: India’s NRR Challenge for Semis

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now