क्रिकेटविश्वात शोककळा, टीम इंडियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचं निधन

On: March 13, 2025 7:49 AM
Indian Cricket Legend Syed Abid Ali Passes Away
---Advertisement---

Indian Cricket | भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू सय्यद आबिद अली (Syed Abid Ali) यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे ते ओळखले जायचे. त्यांनी भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले होते. भारतीय क्रिकेटचा दिग्गज माजी खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Indian Cricket)

सय्यद आबिद अली यांचे निधन 

काही मीडिया रिपोर्टनुसार, सय्यद आबिद अली यांच्या निधनाच्या दुःखद बातमीवर प्रतिक्रिया देताना सुनील गावसकर म्हणाले, “ही बातमी ऐकून मन सुन्न झालं. आबिद अली भारतीय संघासाठी काहीही करण्यास तयार असायचा. तो एक शेरदिल खेळाडू होता. अष्टपैलू असूनही तो बहुतेकदा मधल्या फळीत फलंदाजी करायचा, परंतु गरज असेल तेव्हा सलामीवीर म्हणूनही मैदानावर उतरायचा. क्षेत्ररक्षणातही त्याने अनेक अविश्वसनीय झेल घेतले होते.”

गावसकर पुढे म्हणाले, “सय्यद आबिद अली यांनी दोन वेळा कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. त्यांच्या जाण्याने क्रिकेटविश्वाला मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

सय्यद आबिद अली यांची क्रिकेट कारकीर्द

सय्यद आबिद अली यांनी भारतीय संघासाठी 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 47 विकेट्स घेतल्या. त्यांनी फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आणि कसोटी कारकिर्दीत 6 अर्धशतकांसह 1,018 धावा केल्या. तसेच, त्यांनी 5 एकदिवसीय सामने खेळून 7 बळी घेतले आणि 93 धावा केल्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. (Indian Cricket)

Title : Indian Cricket Legend Syed Abid Ali Passes Away

 

Join WhatsApp Group

Join Now