Indian Bank Recruitment | बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन बँकेने शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज मागितले आहेत. या बँकेत तब्बल 1500 पदांची भरती होणार आहे. या लेखात भरतीबाबत सगळी माहिती देण्यात आली आहे.
तरुण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणे, असा या भरती मोहिमेचा उद्देश आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा तसंच इतर माहिती जाणून (Indian Bank Recruitment) घेऊयात.
इंडियन बँकेत शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज सुरू
बँकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.indianbank.in वर 1500 शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन बँकेची ही भरती मोहीम तरुण पदवीधरांना बँकिंग क्षेत्रातील मौल्यवान अनुभव मिळविण्याची मोठी संधी देत आहे. त्यामुळे याचा तरुणांनी लगेच लाभ घ्यावा. या भरतीसाठी (Indian Bank Recruitment) वयोमर्यादा ही किमान 20 वर्षे ते 28 वर्षे कमाल वर्षे ठेवण्यात आली आहे.
निवड कशी होईल?
एससी/एसटी/ओबीसी/पीडब्लूबीडी श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
याचबरोबर उमेदवारांनी 31/03/2020 नंतर त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रथम उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा होईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पुढे (Indian Bank Recruitment) उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची इंडियन बँकेत शिकाऊ म्हणून निवड केली जाईल.
News Title – Indian Bank Recruitment 2024
महत्वाच्या बातम्या-
“सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू”; लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा
“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट
बद्रीनाथमधील पातालगंगा टनलजवळ भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग झाले बंद; पाहा थरारक Video
वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!
“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल






