Champions Trophy Final : न्यूझीलंडचे ‘हे’ 4 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी

On: March 6, 2025 9:58 AM
India vs New Zealand final match 
---Advertisement---

India vs New Zealand | चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना येत्या 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 9 मार्च रोजी होणाऱ्या या निर्णायक सामन्यात भारताने आतापर्यंतची विजयी लय कायम राखण्यासाठी 4 खेळाडूंसाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे.   (India vs New Zealand )

रवींद्र रचिनला रोखणे आवश्यक 

भारतीय फिरकीपटूंनी या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे, तर अनुभवी मोहम्मद शमीनेही आपला ठसा उमटवला आहे. मात्र, अंतिम सामन्यात संपूर्ण चित्र बदलू शकते. न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज रवींद्र रचिन हा मोठा अडथळा ठरू शकतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावत आपली चमक दाखवली आहे. आतापर्यंतच्या 3 सामन्यांत त्याने दोन शतकांसह 226 धावा केल्या असून, 75.33 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला रोखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मॅट हेनरीला सामोरे जाण्याचे आव्हान

भारतीय संघासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी मोठा अडथळा ठरू शकतो. लीग सामन्यात त्याने भारतीय टॉप ऑर्डरला अडचणीत टाकले होते. शुभमन गिल आणि विराट कोहली हेनरीसमोर टिकू शकले नव्हते. 8 षटकांत 5 बळी घेत त्याने भारतीय संघाला घाम फोडला होता. आतापर्यंतच्या 4 सामन्यांत 9 बळी घेत त्याने या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्थान मिळवले आहे. अंतिम सामन्यातही तो टीम इंडियासाठी आव्हान निर्माण करू शकतो.

सँटनर-ब्रेसवेल यांचा फिरकीचा प्रभाव

न्यूझीलंडचा अनुभवी मिचेल सँटनर आणि ऑफस्पिनर मायकेल ब्रेसवेल भारतीय फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. सँटनरने 4 सामन्यांत 7 बळी घेतले आहेत, तर ब्रेसवेलनेही 6 बळी घेत फिरकी आघाडी मजबूत केली आहे. या दोघांपासून भारतीय फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे.  (India vs New Zealand )

विल्यमसनला रोखण्याचे आव्हान

न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने सुरुवातीच्या सामन्यांत फारशी चमक दाखवली नव्हती, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत शानदार शतक झळकावून अंतिम सामन्याच्या तोंडावरच तो फॉर्मात आला आहे. निर्णायक सामन्यात विल्यमसन किती घातक ठरू शकतो, हे भारतीय गोलंदाजांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे.

Title : India vs New Zealand final match 

 

Join WhatsApp Group

Join Now