IND vs ENG l टी20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना आज म्हणजेच 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे. गयाना येथे होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र गयाना येथील खेळपट्टी नेमकी अशी आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्या संघाचे वर्चस्व असणार? :
T20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 23 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. यामध्ये टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 11 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी चार वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.
T20 विश्वचषक 2022 मध्ये, इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. जॉस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने चमकदार कामगिरी करत भारताला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच तब्बल 16 महिन्यांनंतर हे दोन संघ पुन्हा एकदा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. त्या पराभवाचा स्कोअर निकालात काढण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहेत.
IND vs ENG l खेळपट्टी कशी असणार? :
गयानामधील खेळपट्टी नेहमीच फिरकीपटूंना फायदेशीर ठरली आहे. भारतीय संघाला या खास गोष्टीचा फायदा होऊ शकतो. फिरकीला उत्तम असलेल्या या खेळपट्टीवर भारताचे रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल इंग्लंडविरुद्ध कहर करू शकतात. त्याचवेळी दुसऱ्या षटकात इंग्लंडकडे फिरकीचा अभाव आहे. मात्र, आदिल रशीद आणि मोईन अली यांना मदत मिळू शकते. प्रेक्षकांना डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. तसेच स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.
भारतीय संघाचे संभाव्य शिलेदार : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंडचे संभाव्य शिलेदार : फिल सॉल्ट, जोस बटलर (wk/c), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले, ख्रिस जॉर्डन.
News Title – India vs England Head to Head in T20I
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये
देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल
या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाची नवीन संधी मिळेल!
दिल्लीत निलेश लंकेंनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण






