डॉलर गडगडला, रुपया मजबूत! शेअर बाजाराने गाठला ऐतिहासिक उच्चांक

On: February 3, 2026 4:59 PM
India-US Trade Deal
---Advertisement---

India-US Trade Deal | आज जागतिक अर्थकारणातून भारतासाठी अत्यंत सकारात्मक संकेत मिळाले. भारत आणि अमेरिका (United States) यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे शेअर बाजारात अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला असून रुपयानेही डॉलरसमोर मोठी झेप घेतली आहे. आयात शुल्क कपातीच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून विविध क्षेत्रांतील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली आहे.

शेअर बाजारात अभूतपूर्व उचल :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील आयात शुल्कात मोठी कपात जाहीर केल्यानंतर आज प्री-मार्केट सत्रातच भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. या बातमीच्या पार्श्वभूमीवर सेंसेक्स (Sensex) तब्बल 3,000 अंकांनी उसळला, तर निफ्टी (Nifty) जवळपास 1,400 अंकांच्या मोठ्या वाढीसह व्यवहार करताना दिसला. या अचानक झालेल्या झपाट्याने गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय वाढ झाली असून बाजारातील वातावरण पूर्णपणे सकारात्मक झाले आहे. (India-US Trade Deal)

भारत-अमेरिका (India-US) या ऐतिहासिक करारामुळे ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत अधिक संधी मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून विशेषतः आयटी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना या घडामोडींचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे चित्र आहे. एका दिवसात झालेल्या या प्रचंड वाढीने भारतीय शेअर बाजाराने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ( Indian stock market)

India-US Trade Deal | डॉलर स्वस्त, रुपया मजबूत :

केवळ शेअर बाजारच नव्हे तर परकीय चलन बाजारातही भारताची स्थिती भक्कम झाली आहे. अमेरिकेने टॅरिफमध्ये कपात केल्यानंतर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मजबूत झाला आहे. डॉलरचे मूल्य आता थेट 1 रुपया 10 पैशांनी कमी झाले असून यामुळे आयात खर्चावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कच्च्या तेलासह परदेशातून होणाऱ्या वस्तूंच्या खरेदीत देशाला याचा फायदा होणार आहे.

सोमवारी रात्री उशिरा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) प्लॅटफॉर्मवरून या कराराची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरील मैत्री आणि आदरामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराला संमती देण्यात आली असून, परस्पर आयात शुल्क 25 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. ही कपात तात्काळ लागू होणार असल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ (X) वरून ट्रम्प यांचे आभार मानत दोन्ही देशांमधील सहकार्यामुळे जागतिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील, असे मत व्यक्त केले आहे.

News Title: India-US Deal Boosts Markets

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now