Pune : धार्मिक कार्यांसाठी पवित्र मानले जाणारे गंगाजल (Gangaajal) आता आपल्या घराजवळील टपाल कार्यालयातही उपलब्ध होणार आहे. नागरिकांना गंगाजल मिळवण्यासाठी आता हरिद्वार किंवा ऋषिकेशला जाण्याची गरज भासणार नाही. टपाल विभागाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला असून, अवघ्या ३० रुपयांत गंगाजल (Gangaajal) उपलब्ध करून दिले जात आहे.
गंगाजल कशासाठी वापरतात?
हिंदू धर्मात गंगा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गंगाजल हे पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. धार्मिक कार्यांमध्ये, पूजेसाठी, तसेच घरातील शुद्धीकरणासाठी गंगाजलाचा वापर केला जातो. अनेक जण हरिद्वार किंवा ऋषिकेशला जाऊन गंगाजल घेऊन येतात. परंतु सर्वांनाच ते शक्य होत नाही.
कुठे मिळेल Gangaajal?
टपाल विभागाने आपल्या निवडक टपाल कार्यालयांमध्ये गंगाजल विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांना त्यांच्या जवळच्या महत्वाच्या टपाल कार्यालयात जाऊन गंगाजल खरेदी करता येईल.
किंमत किती रुपये?
गंगाजल २५० मिलीच्या बाटलीसाठी फक्त ३० रुपये मोजावे लागतील. नागरिकांना हे गंगाजल ऑनलाईन पद्धतीनेही बुक करता येईल. त्यासाठी टपाल विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘गंगाजल’ या पर्यायावर क्लिक केल्यास आवश्यक ती सर्व माहिती मिळेल. स्पीड पोस्टाने गंगाजल मागवण्यासाठी १२१ रुपये शुल्क आकारले जाईल.
ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध-
भाविकांना आता घरबसल्या गंगाजल मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत भाविक ऑनलाईन पद्धतीने गंगाजल बुक करू शकतात. हरिद्वार आणि ऋषिकेश येथून हे गंगाजल मागवण्यात येते.
नागरिकांची सोय होणार-
“आमच्या अनेक कार्यालयांमध्ये गंगाजल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. नागरिक टपाल कार्यालयात येऊन गंगाजल घेऊन जात आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे. सण, समारंभ, धार्मिक कार्यासाठी गंगाजल लागते. आमच्या निवडक कार्यालयांमध्ये गंगाजल उपलब्ध आहे,” असे बी. पी. एरंडे, अधीक्षक, टपाल विभाग, लोकमान्यनगर यांनी सांगितले.
सर्वांना Gangaajal मिळावे हा उद्देश
देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भाविकांना गंगाजल उपलब्ध व्हावे आणि त्याचे पावित्र्यही जपले जावे, हा या योजनेमागचा हेतू आहे. यासाठी पोस्ट खात्याची वेबसाईट आणि केंद्र सरकारच्या वेबसाईटचा वापर केला जाणार आहे. या सुविधेमुळे सर्व भाविकांना आता सहजपणे आणि कमी खर्चात गंगाजल मिळवणे शक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शेकोटी करत असाल तर सावधान, ‘या’ गोष्टी कराल तर दाखल होऊ शकतो गुन्हा!
‘आमच्या परळीत प्राजक्ता ताई…’; सुरेश धसांनी सगळंच सांगितलं
बीडमध्ये गुन्हेगारीचा महापूर! तब्ब्ल ‘इतक्या’ जणांकडे शस्त्र परवाना?
राज्यावर पावसाचं सावट! ‘या’ तारखेला अवकाळी पावसासह गारपीट होणार?






