Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेल्या टॅरिफ धमक्यांनंतर आता आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले होते. मात्र या दबावाला न जुमानता भारताने आता आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी रणनीती आखली असून, त्यामुळे ट्रम्प यांना जबरदस्त हादरा बसल्याचे चित्र आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंवर एकूण ५० टक्के टॅरिफ आकारला जात आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार करार थंडावला असून, याचा थेट फटका दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांना बसला आहे. दरम्यान भारताने अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर देत चीन आणि रशियाकडे आपली निर्यात वाढवली आहे. (27 Countries Trade Agreement)
अमेरिका-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी व्यापारिक दिशा :
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि चीन तसेच रशियामधील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत. हाच मुद्दा सध्या अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेली मोठी ट्रेड डील सध्या रखडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे ही डील पुढे सरकली नाही, असा आरोपही अमेरिकेकडून करण्यात आला आहे. (India EU Trade Deal)
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने आता युरोपकडे आपला मोर्चा वळवला आहे. अमेरिकेचा दबाव असतानाही भारताने पर्यायी बाजारपेठांचा शोध घेतल्याने जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक ठोस होत आहे. यामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Donald Trump | भारत-युरोपीय संघाच्या ऐतिहासिक कराराच्या दिशेने वाटचाल :
भारत आणि युरोपीय संघ यांच्यात सध्या जगातील सर्वात मोठ्या व्यापारी कराराबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत. युरोपीय संघामध्ये एकूण २७ देशांचा समावेश असून, या सर्व देशांसोबत भारत व्यापार करार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ब्रुसेल्स येथे युरोपीय संघातील वरिष्ठ नेत्यांसोबत अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. (Donald Trump India Tariff)
या बैठकीत भारत-युरोपीय संघ ट्रेड डीलचे अंतिम स्वरूप काय असेल, यावर सविस्तर चर्चा झाली. सध्या ही डील अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे युरोपीय संघावरही आंतरराष्ट्रीय दबाव वाढला असून, त्यामुळे भारतासोबतचा हा करार त्यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरत आहे.
जर हा करार अंतिम झाला, तर तो जगातील सर्वात मोठा व्यापारी करार ठरेल आणि अमेरिकेसाठी हा मोठा धोरणात्मक धक्का मानला जाईल. भारताने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता जागतिक व्यापारात स्वतःची ताकद सिद्ध केल्याचं हे स्पष्ट उदाहरण ठरत आहे.






