IND vs ZIM l क्रिकेटप्रेमींनो भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 6 जुलै रोजी होणार आहे. भारताचा युवा संघ या दौऱ्यासाठी पाठवण्यात आला आहे. शुभमन गिलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे गिल पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
या मैदानावर भारताने 2 सामने गमावले :
या मैदानावर भारताने 2 सामने गमावले आहेत. एकूण 41 T20 आंतरराष्ट्रीय सामने येथे खेळले गेले आहेत. झिम्बाब्वेने येथे 38 सामने खेळले असून 9 जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामने जिंकले आहेत तर पाठलाग करणाऱ्या संघाने 18 सामने जिंकले आहेत. हरारेची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी उपयुक्त आहे. सुरुवातीला विकेट वेगवान गोलंदाजांना मदत करते पण जसजसा खेळ पुढे सरकतो तसतसे फिरकीपटू वरचढ होतात. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची येथे सरासरी 156 धावा असतात.
IND vs ZIM l या सामन्याबद्दलची संपूर्ण माहिती :
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना शनिवार, 6 जुलै रोजी होणार आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना कोठे खेळवला जाईल?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होईल. तसेच नाणेफेक 4 वाजता होईल.
सामना कुठे पाहता येईल? :
प्रेक्षकांना भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
News Title – IND vs ZIM Live Streaming
महत्वाच्या बातम्या-
या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता
परीक्षा न देता थेट बँकेत मिळवा नोकरी; ‘या’ पदांसाठी अर्ज झाले सुरू
‘एवढं लक्षात ठेवा’ अजित पवारांची भरसभेत कविता; जयंत पाटलांना हसू अनावर
“अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर…”; रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला नितेश राणेंच प्रत्युत्तर
लठ्ठपणा कमी करेल, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहील; गूळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे






