निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

On: December 8, 2022 11:18 AM
---Advertisement---

नवी दिल्ली | अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणीलाही सुरूवात झाली आहे.

गुजरात हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जातो. 182 जागांसाठी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या.

निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं म्हणलं जात होत. आता मात्र एक्झिट पोल (Exit polls) नुसार गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि आपचे काय होणार असा प्रश्न पडला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडलं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

निकालानंतर घोडेबाजार होऊ शकतो यामुळे काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला आहे. आणि घोडेबाजार होऊ नये यासाठी काँग्रेसने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांना (MLAs) हाॅटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.

या आमदारांना राजस्थानमध्ये (Rajasthan) हलवण्यात येणार असल्याचं कळतंय. काँग्रेसच्या विजयी आमदारांना रात्री 8 पर्यंत जयपूरच्या हाॅटेल हलवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now