‘संकेत बावनकुळेसह मित्र…’; नागपूर हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर

On: September 10, 2024 12:27 PM
Chandrashekhar bawankule
---Advertisement---

Nagpur Hit And Run | भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या (Nagpur Hit And Run) रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये नव्हता, अशी माहिती मिळत आहे. आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस संबधित घटनेचा तपास करत आहेत, या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी हल्लाबोल केला आहे, त्याचबरोबर केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते. त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत, असं देखील अंधारेंनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे यांनी या अपघातानंतर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अपघातावेळी भरधाव आलिशान ऑडी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना, हा अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, अपघात घडवणारी ऑडी कार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती मिळत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

या अपघातातील गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सोलापूरात भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?

खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती

राहुल गांधींसोबत दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण?; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या किंमती?

बाप्पाच्या कृपेने आज मेषसह ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now