बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांबाबत घेतला मोठा निर्णय!

On: August 22, 2024 8:20 AM
important instructions to schools after badlapur incident
---Advertisement---

badlapur incident | राज्यात बदलापूर येथील शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांना महत्वाचे आदेश दिले आहेत. (badlapur incident )

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये 6 महत्वाचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

शाळांना देण्यात आले महत्वाचे 6 आदेश

शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे : शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा येत्या एक महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त बसविणे बंधनकारक राहील. तसेच, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले(badlapur incident ) नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे.

शिक्षकांच्या नियुक्तीची काळजी : नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकांबाबत शाळा व्यवस्थापनामार्फत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. तसेच, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असेही सूचविण्यात आले आहे.

तक्रार पेटी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत 5 मे 2017 ला आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भात शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या तक्रार पेटीचा वापर प्रभावीपणे होतो किंवा कसे याची जबाबदारी(badlapur incident ) शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे.

सखी सावित्री समिती : शाळा, केंद्र, तालुका अथवा शहर साधन केंद्र या स्तरावर 10 मार्च 2022 च्या परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. यात समितीने करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहेत.

विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन : लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार घडत असल्याने शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल.

राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने (badlapur incident )तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा आणि त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

News Title – important instructions to schools after badlapur incident

महत्त्वाच्या बातम्या-

व्यवसायात भरभराट ते धनप्राप्तीचा योग, ‘या’ राशींचे येणार सोनेरी दिवस

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवलयं तर अशाप्रकारे ब्लॉक करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

पुढील काही दिवसात सोन्याच्या किंमतीत होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या आजचे दर

बदलापूर आंदोलनप्रकरणी चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप!

Join WhatsApp Group

Join Now