धक्कादायक! ‘या’ बँकेला ५९० कोटींचा चुना; कर्मचाऱ्यांनीच सरकारी पैशावर मारला डल्ला!

On: February 24, 2026 9:45 AM
IDFC First Bank Scam
---Advertisement---

IDFC First Bank Scam | हरियाणा सरकारच्या खात्यांतील तब्बल 590 कोटी रुपये आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) च्या चंदीगड शाखेतून वळवले गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींशी हातमिळवणी केल्याचा संशय व्यक्त होत असून, घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बनावट कागदपत्रांतून कोट्यवधींची वळवणूक :

18 फेब्रुवारी 2026 रोजी हरियाणा सरकारच्या विविध संस्थांनी त्यांच्या खात्यांतील शिल्लक रकमेची पडताळणी केली असता मोठी तफावत आढळली. सुरुवातीला सुमारे 490 कोटी रुपयांची कमतरता दिसून आली. तपास पुढे सरकल्यानंतर आणखी 100 कोटी रुपयांचा गैरहिशोब उघड झाला आणि एकूण रक्कम 590 कोटींवर पोहोचली. या प्रकारामुळे प्रशासनालाही सुरुवातीला धक्का बसला. (Haryana government funds)

बँकेच्या माहितीनुसार, संबंधित शाखेतील काही अधिकाऱ्यांनी बाहेरील घटकांच्या संगनमताने बनावट धनादेश आणि खोट्या अधिकृत पत्रांचा आधार घेत व्यवहार केले. हे व्यवहार नियमित प्रणालीऐवजी मॅन्युअल पद्धतीने नोंदवले गेले. त्यानंतर ही कोट्यवधींची रक्कम इतर लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. तपासादरम्यान 500 कोटींहून अधिक निधी बेकायदेशीररीत्या वळवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

IDFC First Bank Scam | सरकार आणि आरबीआयची कारवाई :

प्रकरण उघड झाल्यानंतर हरियाणा सरकारने तत्काळ आयडीएफसी फर्स्ट बँक तसेच एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) यांना सरकारी व्यवहारांतून काळ्या यादीत टाकले. सर्व शासकीय विभागांना या बँकांतील खाती बंद करून निधी इतरत्र वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे दोन्ही बँकांवर तात्काळ परिणाम झाला. (IDFC First Bank Scam)

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या घटनेमुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला कोणताही सिस्टेमिक धोका नसल्याचे स्पष्ट केले. हा प्रकार केवळ चंदीगड शाखेतील काही विशिष्ट खात्यांपुरता मर्यादित असल्याचे त्यांनी नमूद केले. चार संशयित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनीही हा प्रकार प्रणालीगत बिघाडामुळे झालेला नसल्याचे स्पष्ट केले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही वैद्यनाथन यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत वरिष्ठ व्यवस्थापनाचा सहभाग आढळलेला नाही; हा कर्मचारी स्तरावरील फसवणुकीचा प्रकार असून बाह्य व्यक्तींचाही यात हात असल्याचे दिसते.

News Title: IDFC First Bank 590 Crore Fraud

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now