IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, धक्कादायक माहिती समोर

On: July 16, 2024 3:46 PM
IAS Pooja Khedkar Interrogated For Three Hours Marathi News
---Advertisement---

IAS Pooja Khedkar | गेल्या काही दिवसांपासून IAS पूजा खेडेकर प्रकरण (IAS Pooja Khedkar) चर्चेत आहे. याचपार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची तीन तास पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशी दरम्यान अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मात्र त्या अद्यापही समोर आलेल्या नाहीत.

वाशिम जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आराज यांच्यासह दोन अधिकारी होते. त्यांनी बंद खोलीत पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची चौकशी केली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. यामुळे पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची नेमकी काय चौकशी झाली हे मात्र कळू शकलं नाही.

समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार- पूजा खेडकर

वाशिम जिल्हाधिकारी परवानगी घेऊन वादग्रस्त पूजा खेडकर यांनी स्वत:च काही विषय मांडायचे म्हणून संबंधित पोलीस अधिकारी यांना बोलून घेतलं. परंतु त्यावेळी नेमकी काय चौकशी झाली, हे समोर आलं नाही. दरम्यान माध्यमांशी बोलताना वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांनी माझ्यावर खूप आरोप होत आहे. त्याचे उत्तर मी कमिटीमध्ये देईल. मी समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार असल्याचं पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) म्हणाल्या.

पूजा खेडकर यांनी तब्बल 11 वेळा स्वत:चे नाव बदलले

यूपीएससीसाठी पूजा खेडकर यांनी तब्बल 11 वेळा स्वत:चे नाव बदलले आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारास सहा संधी असतात. तर ओबीसी उमेदवारांना 9 वेळा संधी देण्यात आली आहे. परंतु पूजा खेडकर यांनी 11 वेळा परीक्षा दिल्याचं वृत्त व्हायरल होत असून त्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, 2020 या वर्षात पूजा दिलीपराव खेडकर या नावाचा उल्लेख केला. तसेच 2021 या वर्षात पूजा मनोरमा या नावाचा उल्लेख केला. आपल्या नावात एक दोनदा नाहीतर तब्बल 11 वेळा पूजा खेडकर यांनी नावात बदल केला आहे.

पूजा खेडकर या दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांची दखल ही दिव्यांग आयुक्तालयाने घेतली आहे. या प्रकरणाचे आदेश हे पुणे जिल्हाधिकारींना असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – IAS Pooja Khedkar Interrogated For Three Hours Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी मागणी!

पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली, मृतांचा आकडा आला समोर

23 वर्षीय तरूणीने संपवलं आपलं जीवन, मरीन ड्राईव्हवरून समुद्रात घेतली उडी

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!

“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”; जरांगेंची पुन्हा एकदा भुजबळांवर सडकून टीका

Join WhatsApp Group

Join Now