सांगली हादरली! दारुच्या नशेत नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य

On: March 28, 2025 1:01 PM
crime news
---Advertisement---

Sangli Crime | सांगली जिल्ह्यातील शिराळा (Shirala) तालुक्यात मांगले गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला आहे. आरोपीने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला, त्यामुळे या प्रकरणाने अधिकच खळबळ उडवली आहे.

घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून हत्या

प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, मंगेश चंद्रकांत कांबळे हा तिचा पती आरोपी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता आणि दोन मुलं काही दिवसांपूर्वी मुंबईहून सांगलीत आले होते. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी ते आपल्या आई आणि भावाकडे आले होते.

या काळात मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात काही कारणावरून वाद झाले. घटनेच्या दिवशी मंगेशचा भाऊ आणि त्याच्या आई गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी मंगेश आणि प्राजक्ता एकटेच असताना, वाद अधिकच वाढला आणि रागाच्या भरात मंगेशने प्राजक्ताचा गळा ओढणीने आवळून खून केला.

मृतदेह लपवण्यासाठी अमानुष कृती

हत्या केल्यानंतर मंगेशने मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला. त्याने मृत प्राजक्ताचे हात-पाय तोडले आणि विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत तिला ठेवलं. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो घरातून बाहेर निघून गेला.

मुलाने उघड केला धक्कादायक सत्य

मंगेशने आपल्या भावाला फोन करून गाडी घेऊन येण्यास सांगितले. त्याने भाऊ निलेशला सांगितले की, तो शिराळ्याला निघाला आहे. मात्र, यावेळी त्यांचा सहा वर्षांचा मुलगा शिवम घराच्या बाहेर रडत होता. निलेशने विचारपूस केली असता, शिवमने सांगितले की, “पप्पांनी मम्मीला मारले आणि खोलीत ठेवलं.”

शिवमच्या बोलण्यावरून निलेशला संशय आला. त्याने तातडीने आपल्या बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावले. तिघांनी मिळून मंगेशला फोन केला. संशय अधिक बळावल्याने तिघांनी त्याला विचारले, तेव्हा मंगेशने आपला गुन्हा कबूल केला. कुटुंबीयांनी त्याला पोलिसांत आत्मसमर्पण करण्यास सांगितले, त्यानंतर मंगेश स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला.

या घटनेमुळे मांगले गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपी मंगेश कांबळे याला ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू आहे. नागरिक आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहेत.

Title : Sangli-Crime-Husband-Kills-Wife-Murder-Case

Join WhatsApp Group

Join Now