HSC Result l 12वी बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
कोकण विभागाने पटकावला अव्वल क्रमांक :
अशातच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यासंदर्भात बोर्डाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. बोर्डाने विभागानुसार निकाल जाहीर केला आहे. मात्र विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीचा निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. तर यंदाच्या वर्षी ही बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. याशिवाय 97.51 टक्के निकालासह कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकवला आहे. तसेच सर्वात शेवटच्या नंबरवर मुंबई विभाग आहे. मुंबई विभागाचा निकाल हा 91.95 टक्के इतका लागला आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे.
HSC Result l विभागनिहाय निकाल काय आहे:
कोकण विभाग : 97.51 टक्के
पुणे विभाग : 94.44 टक्के
कोल्हापूर विभाग : 94.24 टक्के
अमरावती विभाग : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर विभाग : 94.08 टक्के
नाशिक विभाग : 94.71 टक्के
लातूर विभाग : 92.36 टक्के
नागपूर विभाग : 93.12 टक्के
मुंबई विभाग : 91.95 टक्के
या वेबसाईटवर पाहा निकाल :
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
News Title – HSC Result 2024 Declared
महत्त्वाच्या बातम्या-
पोर्शे कारसंदर्भात धक्कादायक माहिती समोर; वडिलांनीच मला…
आली रे आली आता तुझी बारी आली; ‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!
सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल
आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी
पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या






