अपघातानंतर ‘त्या’ एका वस्तूमुळे अजितदादांची अखेरची ओळख पटली!

On: January 28, 2026 2:06 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली, याबाबत आता सविस्तर माहिती समोर येत आहे.

शेतात कोसळलेलं विमान आणि भीषण स्फोट :

हा अपघात VSR (VSR) कंपनीच्या विमानाशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. शेतात विमान कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर सलग चार ते पाच स्फोट झाले, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. आगीचा वेग इतका तीव्र होता की ती तात्काळ नियंत्रणात आणणं शक्य झालं नाही. (Ajit Pawar Death)

अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विमान पूर्णपणे जळाल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. मदतकार्य सुरू असतानाच स्पष्ट झालं की, अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या इतर प्रवाशांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar | घड्याळ, गॉगल आणि जॅकेटमुळे ओळख पटली :

अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटवणं मोठं आव्हान ठरलं होतं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळ, त्यांनी घातलेला गॉगल आणि अंगावरील जॅकेटच्या आधारे ओळखण्यात आला. ही चिन्हं पाहून उपस्थितांनी त्यांच्या ओळखीची खात्री केली, अशी माहिती मदतकार्य करणाऱ्यांनी दिली.

यानंतर मृतदेह झाकण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांच्या घरातील ब्लँकेट आणि कपडे पोलिस तसेच मदत पथकाला दिले. सर्व मृतदेह काळजीपूर्वक रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. दरम्यान, नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA – Directorate General of Civil Aviation) या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आणली असून, बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच विमान शेतात कोसळून त्याला आग लागल्याचं स्पष्ट केलं आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, स्फोट झाल्यानंतर ते घटनास्थळी आले असता विमान पेटलेलं होतं आणि काही क्षणांतच अनेक स्फोट झाले, ज्यामुळे गर्दी जमली आणि परिस्थिती अधिक भयावह झाली.

News Title: How Ajit Pawar Was Identified

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now