Horoscope Today | आज 12 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी आज रात्री 11 वाजून 33 मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मूळ नक्षत्र 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल ते जाणून घेऊयात. (Horoscope Today)
दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचे राशी भविष्य-
मेष राशी : आजचा दिवस संकटांचा असेल, मात्र त्यातून तुम्ही यशस्वीपणे बाहेर पडाल. जास्त चिडचिड करू नका. हातात आलेली कामे यामुळे निसटतील.राजकारणात तुम्हाला अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते.(Horoscope Today)
वृषभ राशी : आज तुमचा नोकरीचा शोध पूर्ण होईल. लग्नाशी संबंधित कामात खूप व्यस्तता राहील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावाल. औद्योगिक व्यवसाय वाढवण्याची योजना यशस्वी होईल. आजचा दिवस प्रगतीचा आहे.
मिथुन राशी : आज दिवसभरात तुम्हाला शुभ बातमी मिळेल. नफा-तोट्याकडे लक्ष ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. (Horoscope Today)
कर्क राशी : आज दिलासादायक दिवस जाईल. कामातून मनासारखे समाधान मिळेल. स्वतःला वेळ द्याल. आपल्या गुणांना चालना द्याल. संगीतातून आनंद मिळेल.
सिंह राशी : व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा. हातातील अधिकार वापरता येतील.आवडीच्या वस्तु खरेदी कराल. आनंद वार्ता मिळू शकतील. (Horoscope Today)
कन्या राशी : जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. बाहेर फिरायला जाल. आवडीच्या ठिकाणी भेट द्याल. जवळच्या व्यक्तींशी आज तुमची भेट होईल.
तूळ राशी : नवीन संधीने खुश व्हाल. थोडी तडजोड करावी लागेल. अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका.
वृश्चिक राशी : आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेरचे अन्न खाऊ नका. जास्त ताण-तणाव घेऊ नका. आरोग्य जपा (Horoscope Today)
धनू राशी : आजचा दिवस मनासारखा घालवाल. मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. जोडीदाराशी मतभेद संभवतात.
मकर राशी : तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य हरवू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन चालू ठेवा.
कुंभ राशी : मनातील इच्छा पूर्ण होईल. गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. (Horoscope Today)
मीन राशी : तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. आजचा दिवस खरेदीचा असेल. आज तुम्हाला जुने मित्र भेटतील.
News Title : Horoscope Today September 12
महत्वाच्या बातम्या-
वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मलायकाचा पहिला VIDEO समोर
राज्यात टायफॉईडची साथ, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?
या दोन मोठ्या बँकांना RBI ने दिला दणका; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
मलायका अरोराच्या वडिलांचा टोकाचा निर्णय; नेमकं काय झालं होतं?






