बाप्पाच्या आशीर्वादाने महिन्याची सुरुवात, पाहा तुमच्या राशीभविष्यात आज काय लिहिलंय?

On: October 1, 2024 7:55 AM
Horoscope Today 1 October
---Advertisement---

Horoscope Today | आज 1 ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस असून आज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. या तिथीला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि शुक्ल योगाचा योगायोग जुळून आला आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची कृपा देखील काही राशीवर राहील. तर महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीनला कसा जाईल हे पाहुयात. (Horoscope Today)

आजचे राशी भविष्य

मेष : घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल. आज प्रसन्न राहाल.

वृषभ : आज तुम्ही भविष्याच्या दृष्टीने नवीन योजना आखाल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.(Horoscope Today)

मिथुन : आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. सरकारी योजना मंजूर होतील, त्यामुळे दिवसभर आनंदी राहाल. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.(Horoscope Today)

कर्क : नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला आज मोठा नफा होईल.

सिंह : आज महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो. बुद्धीचा योग्य वापर करा. व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या : आज तुमच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न राहतील. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. आज अधिक खर्च होऊ शकतो, त्यामुळे खरेदी करताना विचार करा.

तूळ : आज तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त कराल. तुमच्या भावनांना महत्व दिले जाईल. त्यामुळे आजचा दिवस कायम स्मरणात राहील. आज तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत संपूर्ण दिवस व्यतीत कराल.

वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील.(Horoscope Today)

धनू : कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल. आज तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना विचार करून बोला.

मकर : काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.

कुंभ : कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. आज तुम्हाला जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.(Horoscope Today)

मीन : नोकरदारांना आजचा दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत. महिलांसाठी आजचा दिवस आनंदी जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेसाठी उत्तम व्यासपीठ मिळेल. त्यामुळे सकारात्मक विचार करून प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल.

News Title : Horoscope Today 1 October

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीच्या गाडीचा भीषण अपघात

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत

सरकार म्हणजे विषकन्या; भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर

पवारांची बारामती हादरली! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये चाकू खुपसून विद्यार्थ्याचा खून

Join WhatsApp Group

Join Now