Home Loan Interest Rate | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2025 मध्ये रेपो रेटमध्ये एकूण 1.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 5 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला असून, त्याचा थेट फायदा बँक ग्राहकांना मिळू लागला आहे. अनेक बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात जाहीर केली आहे.
आरबीआयकडून व्याजदर कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सर्वात आधी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे घर खरेदी करण्याची योजना असलेल्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Home Loan Interest Rate)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे गृहकर्ज दर :
सार्वजनिक क्षेत्रातील बँका सध्या सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of maharashtra), सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये गृहकर्जाचे व्याजदर 7.10 टक्क्यांपासून सुरू होतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून 7.25 ते 8.70 टक्क्यांदरम्यान गृहकर्ज दिले जाते. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)7.20 टक्क्यांपासून गृहकर्ज देते, तर कॅनरा बँक आणि यूको बँक महिला व पगारदार कर्जदारांना विशेष सवलत देतात. (Housing Loan India)
खासगी बँकांच्या तुलनेत सार्वजनिक बँकांचे दर कमी असले तरी खासगी बँकांमध्येही काही प्रमाणात कपात झाली आहे. आयसीआयसीआय बँक 7.65 टक्के, तर कोटक महिंद्रा बँक 7.70 टक्क्यांपासून गृहकर्ज देते. ॲक्सिस बँकेचे व्याजदर 8.35 ते 12 टक्क्यांपर्यंत आहेत, जे ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार ठरतात.
Home Loan Interest Rate | हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे दर :
स्वयंरोजगार करणाऱ्या आणि खास श्रेणीतील ग्राहकांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्या कर्ज पुरवतात. एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि आयसीआयसीआय होम फायनान्सकडून 7.50 टक्क्यांपासून गृहकर्ज मिळते. बजाज हाऊसिंग फायनान्स 7.40 टक्के, तर टाटा कॅपिटल आणि आदित्य बिर्ला कॅपिटल 7.75 टक्क्यांपासून गृहकर्ज देत आहेत.
चांगला क्रेडिट स्कोअर, उत्पन्नाची स्थिरता, कर्जाची रक्कम आणि मालमत्तेचा प्रकार यावर अंतिम व्याजदर अवलंबून असतो. महिला कर्जदारांना आणि होम लोन ट्रान्सफर करणाऱ्यांना अतिरिक्त सवलती मिळतात. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी सर्व अटी आणि अंतिम व्याजदर तपासणे अत्यंत आवश्यक आहे.






