Hema Malini | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबाने सर्व विधी अत्यंत गुप्ततेत पूर्ण केले. त्यांच्या प्रार्थना सभेपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत कोणताही फोटो किंवा माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आणि प्रश्न निर्माण झाले. अखेर हेमा मालिनी यांनी या सर्व गुप्ततेमागचं कारण स्वतः स्पष्ट केलं आहे. (Hema Malini Statement)
वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीबाबत काही दिवसांपासून अनेक अफवा पसरत होत्या. पण निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत देओल कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. यामुळे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या.
हेमा मालिनींच्या भेटीत उघड झाला खरा खुलासा :
अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर काही दिवसांनी हमद अल रियामी यांनी हेमा मालिनींची भेट घेतली. त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी या भेटीत झालेल्या संवादाचा उल्लेख केला आहे. यावेळी हेमा मालिनी अत्यंत व्यथित अवस्थेत दिसल्या आणि धर्मेंद्र यांनी आयुष्यभर जपलेला एक महत्त्वाचा विचार त्यांनी शेअर केला.
हेमा मालिनी यांनी सांगितले की धर्मेंद्र यांना कधीही आपले दु:ख किंवा आजारपण सार्वजनिक करणे आवडत नव्हते. “त्यांना त्यांच्या कमजोरीत किंवा आजारी अवस्थेत लोकांनी पाहावे, हे ते कधीच मान्य करणार नव्हते,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबाने पूर्ण गोपनीयता पाळण्याचा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या. (Hema Malini Statement)
Hema Malini | कुटुंबाचा निर्णय आणि हेमा मालिनींचे अश्रू :
अंत्ययात्रा न काढणे किंवा एकही फोटो बाहेर न देणे हे सगळं धर्मेंद्र यांच्या इच्छेचा आदर म्हणून करण्यात आल्याचं हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, “जीवनात त्यांनी नेहमी आपलं दु:ख लपवलं, आणि शेवटपर्यंत तेच कायम राहावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.”
या संपूर्ण संवादादरम्यान हेमा मालिनींच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, असे हमद अल रियामी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले. “धर्मेंद्र यांच्याबद्दलचं प्रेम कधीच कमी होणार नाही आणि त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर कायम राहील,” असंही त्यांनी नमूद केलं.






