Maharashtra Weather Update | राज्यातील हवामानात सातत्याने चढ-उतार होत असून फेब्रुवारी महिन्यातही कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी थेट अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यातून थंडी जवळपास गायब झाली असून उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र दुपारच्या वेळेस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उकाडाही जाणवू शकतो. पुढील काही तासांत हवामान पुन्हा बदलण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
मुंबईसह अनेक भागांत बदलते वातावरण :
मुंबईत सकाळी धुरकट वातावरण दिसून येत असून दुपारी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास राहू शकते, त्यामुळे उन्हाचा चटका वाढू शकतो. याशिवाय मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा एकदा वाईट श्रेणीत पोहोचला असून आज AQI 204 नोंदवण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
आगामी 48 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने काही भागांत पुन्हा थंडीचा जोर वाढू शकतो. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Update | अतिमुसळधार पावसाचा अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा :
भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर भारतातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी कायम असून काही ठिकाणी तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. तर मध्य आणि पश्चिम भारतात उकाडा जाणवत आहे. देशभरात हवामानातील हे बदल आरोग्यावरही परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






