रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप, म्हणाले …..

On: October 4, 2025 5:24 PM
Ramdas Kadam vs Anil Parab (2)
---Advertisement---

Ramdas Kadam vs Anil Parab | शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह घरी ठेवला, इतकंच नाही तर त्यांचे हाताचे ठसेही घेतले,” असा दावा करत कदमांनी सवाल केला की उद्धव ठाकरे स्वतः का बोलत नाहीत? फक्त त्यांचे चेलेच का उत्तर देतात? त्याचबरोबर त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते अनिल परब यांच्यावरही टिका करत विचारलं, “तुम्हाला मातोश्रीचा वाटा मिळाला का?” (Ramdas Kadam vs Anil Parab)

कदम पुढे म्हणाले, “बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला नाईलाजाने मंत्रिपद दिलं. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. पण 2014 नंतर एकाही मेळाव्यात मला बोलू दिलं नाही”, असा आरोप रामदास कदमांनी केला.

“अनिल परब अर्धवट वकील”- रामदास कदम :

रामदास कदम म्हणाले, “अनिल परब अर्धवट वकील आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते फक्त आपली अज्ञानता दाखवत आहेत. मी ज्यांचा उल्लेख केला त्या डॉक्टरांवरही ते केस करणार का? मी आतापर्यंत गप्प बसलो होतो, पण आता मी या प्रकरणाची CBI चौकशी मागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे.”

कदमांनी ठामपणे सांगितले की, ते  वर्षे मातोश्रीवर राहिले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच उत्तर द्यावे, त्यांच्या चमच्यांनी नाही. त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, “चंद्रग्रहणाच्या रात्री 12 वाजता आपण वरळी येथील स्मशानभूमीत बकरा का कापला? त्यावेळी दोन नंगे बाबा होते, तुम्ही तिथे बकरा कापला का? “, असा प्रश्न रामदास कदम यांनी परबांना विचारला.

Ramdas Kadam vs Anil Parab | पत्नीबाबत आरोपावर प्रत्युत्तर :

अनिल परब यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना कदम म्हणाले, “माझ्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केला नाही. आमच्या खेड येथील घरी गॅसचा स्फोट झाला होता. त्या वेळी तिच्या साडीला आग लागली आणि मीच तिला वाचवलं. परब माझी बदनामी करत आहेत. यावर मी कोर्टात जाणार आहे. माझ्या पुतण्याने आत्महत्या केली नाही, परब खोटं सांगत आहेत.”

कदम म्हणाले, “सावली बार प्रकरणात माझं नाव घेतलं जातंय. पण तो बार नव्हता, तो ऑर्केस्ट्रा होता. आमचं नाव बदनाम करण्यासाठी मुद्दाम हे केलं जातंय. आम्हाला कळलं की त्या ठिकाणी काम करणारी एक मुलगी विक्षिप्त हावभाव करतेय, तर आम्ही तो बंद केला.”

अनिल परबांचा पलटवार :

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी केली होती. यावर परब म्हणाले, “हो करा नार्को टेस्ट, पण रामदास कदम यांचीही करा. त्यांच्या पत्नीने स्वतःला पेटवलं की कदमांनी पेटवलं, ते समजेल. तसेच त्यांच्या पुतण्याने आत्महत्या का केली, हेही कळेल.”

परब पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र आपल्याकडे आहे, आपणच त्या मृत्यूपत्राचे ट्रस्टी आहोत अशी माहिती परबांनी दिली. त्यामुळे अडचण असल्यास कोर्टात जा”, असं असं थेट आव्हान अनिल परबांनी दिलं.

याशिवाय परबांनी पवार मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री यांना प्रश्न केला की ते असे “शिशुपाल” का पाळतात?
परबांनी 1993 मधील घटनेवरही चौकशीची मागणी केली. “जर मुख्यमंत्री चौकशी करणार नसतील, तर आम्ही साक्षीदार आणू,” असा इशारा त्यांनी दिला.

शेवटी परब म्हणाले, “आमच्यासाठी रामदास कदमांची किंमत शून्य आहे. आम्ही त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार आहोत.”

News title :- Heated exchange of allegations between Ramdas Kadam and Anil Parab.

Join WhatsApp Group

Join Now