‘त्या’ रेकॉर्डिंगमुळे मराठा आंदोलक पेटले; आमदार पुत्राला शिकवला धडा

On: October 31, 2023 5:10 PM
---Advertisement---

माढा | मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा त्यांचा सातवा दिवस आहे. राज्यात ठिकठिकाणी आदोलनं चालू आहेत. रस्ता रोको, साखळी उपोषण, राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार, राजकीय नेत्यांन प्रवेश बंदी अशा विविध मार्गांनी आंदोलनं चालू आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या सभा पार पडल्या. लाखोंच्या संख्यने मराठा बांधव त्यांच्या सभेला जमायचे. त्यांची पंढरपुरातही सभा झाली होती. त्यांच्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao shinde) यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjitsinh shinde) यांनी आर्थिक मदत केली होती. त्यांनी केलेली ही मदत बोलून दाखवली. त्यामुळे मराठा आंदोलकांनी एक वेगळेच आंदोलन उभारले. मराठा अंदोलकांनी त्यांच्या ‘फोन पे’ वर 1,2,3 रुपये अशी रक्कम पाठवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रणजितसिंह शिंदे त्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण ?

रणजितसिंह शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. रणजितसिंह देशमुख यांनी ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पंढरपुरात झालेल्या सभेला आर्थिक मदत केल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे मराठा आंदोकांनी एक वेगळीच मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्या ‘फोन पे’ वर 1,2,3 रुपये अशी रक्कम पाठवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now