हरभजन सिंग पुरता फसला? आर्चरला काय बोलून गेला

On: March 24, 2025 2:02 PM
Harbhajan Singh
---Advertisement---

Harbhajan Singh l इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या समालोचनावेळी माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका वादात सापडला आहे. राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याने ‘काळी टॅक्सी’ असा उल्लेख करत आर्चरच्या कामगिरीची तुलना लंडनमधील टॅक्सीशी केली, ज्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

IPL पॅनलमधून हटवण्याची मागणी :

सदर टिप्पणी सामन्याच्या 18 व्या षटकात करण्यात आली. हैदराबादकडून इशान किशन आणि हेनरिक क्लासेन खेळत असताना आर्चरवर सलग दोन चौकार मारले गेले. यावेळी हरभजन म्हणाला, “लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर वेगाने चालते आणि इथे आर्चर साहेबांचे मीटरही वेगाने चालते.” हे वक्तव्य काहींना वर्णद्वेषी वाटले असून नेटिझन्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या टिप्पणीवर संतप्त प्रतिक्रिया देत अनेकांनी हरभजन सिंगला आयपीएल 2025 च्या समालोचन पॅनेलमधून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. काही युजर्सनी या टिप्पण्या ‘लज्जास्पद’ आणि ‘घृणास्पद’ असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Harbhajan Singh l व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल :

दरम्यान, जोफ्रा आर्चरसाठी हा सामना विसरता न येण्यासारखा ठरला आहे. त्याने आपल्या 4 षटकांत 76 धावा दिल्या, जी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी कामगिरी ठरली आहे. याआधी मोहित शर्माने 2024 मध्ये 73 धावा दिल्याचा विक्रम केला होता. हैदराबादने हा सामना 44 धावांनी जिंकत आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे.

News Title: Harbhajan Singh Slammed for ‘Black Taxi’ Comment on Jofra Archer During IPL 2025 Commentary

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now