Pune Traffic Update | पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवार, 19 जानेवारी) ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेमुळे शहरातील अर्ध्याहून अधिक प्रमुख रस्ते सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या स्पर्धेत 40 देशांतील 171 खेळाडू सहभागी होत असून, स्पर्धा मार्ग शिवाजीनगर (Shivajinagar) आणि डेक्कन (Deccan) परिसरातून जाणार असल्याने या भागातील अनेक शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
बंद रस्ते आणि प्रभावित भाग :
आज फर्ग्युसन कॉलेज रोड (FC Road), गणेशखिंड रोड (University Road), जंगली महाराज रोड (जेएम रोड), शिमला ऑफिस जंक्शन ते संचेती हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता, तसेच डेक्कन बस स्टॉप ते गुडलक चौक जोडणारे अंतर्गत रस्ते पूर्णतः बंद असणार आहेत. याशिवाय कार्वे रोड आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम होणार आहे. (Pune Traffic Update NEws)
या प्रमुख मार्गांसह मध्यवर्ती पुण्यातील शिवाजीनगर आणि डेक्कन भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात जाणे टाळावे, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
Pune Traffic Update | पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन :
एफसी रोड आणि जेएम रोडऐवजी अलका चौक, सेनापती बापट रोड (एसबी रोड), भिडे ब्रिज मार्गे रिव्हरबेड रोडचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशखिंड रोडऐवजी पौड फाटा – लॉ कॉलेज रोड – एसबी रोड – औंध रोड – स्पायसर कॉलेज रोड – जुना मुंबई-पुणे महामार्ग हा पर्याय सुचवण्यात आला आहे. (Pune Traffic Update)
तसेच कर्वे रोड आणि डेक्कन भाग बंद असल्याने आरटीओ चौक मार्गे जुन्या शहरातील रस्ते – म्हात्रे ब्रिज – नल स्टॉप असा मार्ग वापरण्यास सांगण्यात आलं आहे. शहरातील बहुतांश प्रमुख मार्ग बंद असल्याने आज पुणेकरांना वळसा घालूनच प्रवास करावा लागणार असून, घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.






