केसातील कोंड्यापासून सुटका हवीये? तर ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी केसांना लावा

On: June 22, 2024 1:07 PM
Dandruff Problem
---Advertisement---

Dandruff Problem l उन्हाळ्यात केसांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. अति उष्णतेमुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. जास्त घाम येणे देखील टाळूसाठी देखील चांगले नाही. कडक उन्हामुळे केस खराब होऊ शकतात. त्यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. मात्र अति उष्णतेमुळेच नाही तर कोंडाही केस कमकुवत करतो.

कोंडा ही केसांची सामान्य समस्या :

कोंडा ही एक केसांची सामान्य समस्या आहे, परंतु यामुळे केस गळणे देखील होऊ शकते. यामुळे केसांच्या कूपांचे नुकसान होते. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास केसांवर आणि टाळूवर वाईट परिणाम होतो. काही घरगुती वस्तू वापरून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

कोंड्याची समस्या वाढत असेल तर यासाठी बहेडा वापरा. केसांच्या वाढीसाठीही हे खूप फायदेशीर आहे. यामुळे कोंडा मुळांपासून दूर होण्यास मदत होते. यासाठी बहेडा फळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर एलोवेरा जेल किंवा दही मिक्स करून टाळूवर लावा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

Dandruff Problem l या गोष्टी आवर्जून वापरा :

कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे जी त्वचेसाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांच्या समस्याही यापासून दूर ठेवता येतात. केसांना कडुलिंब लावून केसगळती आणि कोंडा टाळू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्कॅल्प इन्फेक्शन टाळू शकता. कडुलिंबाच्या पाण्याने केस धुवू शकता.

मेथी केवळ मधुमेहातच फायदेशीर नाही तर केसांमधील कोंडा दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. केसांमध्ये कोंडा किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास मेथीचा वापर करा. तुम्ही मेथीच्या पाण्याने तुमचे डोके धुवू शकता किंवा त्याची पेस्ट टाळूवर लावू शकता. यामुळे कोंडा हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल.

News Title – Hair Dandruff Problem Solution

महत्त्वाच्या बातम्या

ह्युंदाई कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद होणार

सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!

अगदी वरचा देव जरी आला तरी… उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड

ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

ओबीसींसाठी महत्वाचा दिवस; लक्ष्मण हाकेंच्या भेटीला ‘हे’ मोठे मंत्री जाणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now