पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय

On: June 21, 2024 11:11 AM
Hair Care Tips
---Advertisement---

Hair care in monsoon | पावसाळा म्हटलं की मनसोक्त भिजण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. पहिल्या पावसात भिजण्याची मज्जा तर काही वेगळीच असते. बऱ्याचदा ऑफिसहून किंवा कॉलेजहून घरी येताना छत्री घरी विसरली किंवा इतर काही करणांमुळे पावसात भिजावं लागलं तर मोठी पंचाईत होते. त्यातच पावसामुळे केस ओले झाले तर केस खूप खराब होतात.

पावसात भिजल्याने केस खूप चिकट होऊन जातात. यामुळे बऱ्याचदा केस गळतीची समस्या निर्माण होते. पावसाळ्यात केस गळण्याचे प्रमाण खूपच वाढते. आता यावर उपाय काय करावा?, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर या लेखात दिले आहे.

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?

केस नीट वॉश करा: पावसाळ्यात आरोग्यासोबतच केसांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे. चांगल्या दर्जाच्या शाम्पूने केस धुवून काढा. यामुळे केसात घाण जमा होणार नाही.

केसांना कंडिशनिंग करा : यासोबतच नियमित कंडिशनिंग केल्यामुळे तुमचे केस हायड्रेटेड राहतात आणि केसांना एक शाईन राहते. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मॉईश्चरायझिंग कंडिशनर (Hair care in monsoon) वापरायला हवे. त्यामुळे नुसतेच केस धुवून काही होत नाही तर, त्याला व्यवस्थित कंडिशनिंग करणे देखील आवश्यक असते.

हिट स्टायलिंग टूल्सचा कमी वापर करा : पावसाळ्यात बरेच जण हिट स्टायलिंग टूल्सचा वापर करतात. मात्र, यामुळे तुमचे केस अजूनच खराब होऊ शकतात. तुमच्या केसांचा नैसर्गिक पोत राखण्यासाठी जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या केसांना हवेत कोरडे होऊ द्या. हीट स्टायलिंग टूलसा होईल तेवढा कमी वापर करा.

केस ओले ठेवू नका : याचबरोबर पावसाळ्यात आठवड्यातून किमान दोन वेळा तरी कोमट तेलाने केसांना मसाज करा. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळेल आणि केस गळती (Hair care in monsoon) थांबण्यास मदत होईल. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा केस लवकर कोरडे होत नाहीत. मात्र, ओले केस ठेवल्याने केस गळती वाढू शकते. त्यामुळे तुमचे केस जास्त वेळ ओले राहणार नाहीत याची काळजी घ्या.

केस मोकळे सोडू नका : बऱ्याच मुलींना केस मोकळे सोडण्याची फार आवड असते. मात्र मोकळे केस सोडल्याने केस डॅमेज होतात. त्यामुळे शक्य असेल तेव्हा तुमचे केस वेणी किंवा बन सारख्या स्टाईल मध्ये बांधून ठेवा. या टिप्समुळे तुमचे केस नक्कीच चांगले राहतील आणि ते गळणारही नाहीत.

News Title :  Hair care in monsoon 

महत्त्वाच्या बातम्या-

अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..

ग्राहकांना झटका! सोन्याचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

वट सावित्री पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागचे कारण

Join WhatsApp Group

Join Now